Homeताज्या बातम्यादेश

भारतात मुस्लिमांची स्थिती खूप चांगली : अर्थमंत्री सीतारामन

नवी दिल्ली : भारतीय मुस्लिमांची स्थिती पाकिस्तानपेक्षा खूप चांगली असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले. अर्थमंत्री

राज्यसभेच्या ५७ जागांसाठी १० जूनला होणार निवडणूक | LokNews24
ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात
जेष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन

नवी दिल्ली : भारतीय मुस्लिमांची स्थिती पाकिस्तानपेक्षा खूप चांगली असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले. अर्थमंत्री रविवारपासून अमेरिका दौर्‍यावर असून अमेरिकेच्या ‘पीटरसन इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स’मध्ये (पीआयआयई) आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी पीआयआयईचे अध्यक्ष ऍडम एस. पोसेन यांनी निर्मला सीतारामन यांची मुलाखत घेतली. त्यांनी विचारलेल्या प्रश्‍नाच्या अनुषंगाने बोलताना सीतारामन म्हणाल्या की, भारतातील मुस्लिमांची स्थिती खूपच चांगली आहे, लोकांनी भारतात येऊन हे पाहावे. भारत हा दुसरा देश आहे, जिथे सर्वाधिक मुस्लिम राहतात. ही लोकसंख्या सतत वाढत आहे. देशात मुस्लिमांवर अत्याचार होताहेत किंवा त्यात काही तथ्य असेल तर 1947 नंतर भारतातील मुस्लिमांची लोकसंख्या सातत्याने वाढली असती का ? असा सवालही त्यांनी केला.  पाकिस्तानचा संदर्भ देत निर्मला सीतारामन म्हणाल्या, भारताच्या फाळणीनंतर पाकिस्तानची निर्मिती झाली. पाकिस्तानने स्वतःला मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषित केले. असे असूनही पाकिस्तानमध्ये मुजाहिर, शिया आणि इतर गटांसोबत हिंसाचार होत आहे. परंतु, मुख्य प्रवाहातील माध्यमे त्याचे वार्तांकन करत नाहीत. सुनीची (संघटना) अवस्था काही वेगळी नाही. जर आपण भारताबद्दल बोललो तर तुम्हाला दिसेल की इथे मुस्लिम व्यवसाय करतात, त्यांची मुले शिक्षण घेत आहेत, त्यांना सरकारकडून फेलोशिप दिली जात असल्याचे सांगत सीतारामन यांनी भारतातील मुस्लिमांच्या स्थितीवर मोकळेपणाने भाष्य केले.

COMMENTS