Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सावरकरांचा जन्मदिवस ’स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून होणार साजरा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

मुंबई/प्रतिनिधी ः स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा 28 मे हा जन्मदिवस राज्य शासनामार्फत ’स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे, अशी घ

शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक
परंपरेत अडथळा आणू नका
मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देणार

मुंबई/प्रतिनिधी ः स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा 28 मे हा जन्मदिवस राज्य शासनामार्फत ’स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. यादिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांच्या प्रचार-प्रसारासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की, देशाच्या स्वातंत्र्यासाठी, राष्ट्रउन्नतीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे मोठे योगदान आहे. त्यांची देशभक्ती, धैर्य, प्रगतीशील विचारांना पुढे नेण्यासाठी, त्यामाध्यमातून त्यांना अभिवादन करण्यासाठी ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ साजरा करण्याची मागणी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली होती. त्यानूसार शासनाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा 28 मे हा जन्मदिवस राज्य शासनामार्फत ’स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

COMMENTS