नाशिक प्रतिनिधी - गेल्या आठवड्यापासून अवकाळी पाऊसाने थैमान घातले असून ठिकठिकाणी नुकसानिंची हद्द ओलांडली आहेत.नाशिक तालुक्या सह , निफाड , नांद
नाशिक प्रतिनिधी – गेल्या आठवड्यापासून अवकाळी पाऊसाने थैमान घातले असून ठिकठिकाणी नुकसानिंची हद्द ओलांडली आहेत.नाशिक तालुक्या सह , निफाड , नांदगाव , चांदवड , बागलाण , दिंडोरी, चांदवड , मालेगाव आणि कालच्या पाऊसाने पेठ सुरगाणा चांगलेच झोडपून काढले आहेत. पेठ सुरगाणा ओघळता इतर तालुक्यात कांदा, द्राक्ष , यांचे अतोनात नुकसान झालेले आहेत कालच राज्याचे मुख्यमंत्री सटाणा तालुक्यात शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे मनोबल वाढवत शासन आपल्या पाठीशी आहेत असे आश्वासन देऊन निघून गेले मात्र काल पडलेल्या वादळी वाऱ्याने पेठ तालुक्यातील पाड्यावर परिस्थिती काही वेगळी नाहीत.
शेणामातींची व कुडाची छपरे एवढ्या मोठ्या वादळाने , गारपिटीने चांगलीच झोडपून काढली आहेत. अवकाळी पाऊसामुळे कुलवंडी गावातील नागरिक हैराण झाले असून त्याचा खूप वाईट असा परिणाम की , अवकाळी पावसाने श्री रघुनाथ भवर यांच्या घराचे अतोनात नुकसान झाले पूर्ण घराचे छप्पर नष्ट झाले आणि घरात असलेले सर्व अन्न धान्य , तसेच घरात काही दिवसाने लग्न कार्य असल्यानं त्यांनी त्या कार्यासाठी जमा केलेले सर्व साहित्याचे नुकसान झाले आहेत. रघुनाथ भवर हे खूप कष्टाळू तसेच मन मिळाऊ सतत दुसऱ्याच्या मदतीला धाऊन जाणारे मग सुख असो किंवा दुःख त्यांचे नेहमीच सहकार्य लाभत असते आश्या ह्या व्यक्तीवर खूप मोठे संकट आले आहे . त्यांचे आर्थिक नुकसान भरून न येण्या सारखे आहे .त्यांना ह्या संकटातून सावरण्याच्या दृष्टीने आपला एक शेजारी, एक गावकरी ,भाऊ,मित्र या नात्याने आपण सर्व एकत्र येऊन फुल ना फुलाची पाकळी समजून मदतीचा हातभार लाऊया आणि त्यांना ह्या संकटातून बाहेर येण्यास मदत होईल। असे भावनिक आवाहन गावातील नागरिकांनी केले आहेत.
तालुक्यातील संजय वाघ यांनी कुलवंडी गावात भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केल्याने निदर्शनास आले आहेत. यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष. संजय वाघ , हेमंत वाघ, तुकाराम चौधरी, दिलीप महाले, देवा पालवी, पांडुरंग बदादे, गटविकास अधिकारी शिंदे साहेब , जाधव साहेब , तलाठी वाकदकर , ग्रामसेविका कविता महाले , आदि अधिकारी व नागरिक घटनास्थळी उपस्थित होते .
कालच्या अवकाळी पाऊसाने बऱ्याच शेतकऱयांचे अतोनात नुकसान केले आहेत। कुलवंडी गावात प्रत्यक्ष भेट दिली असता रघुनाथ सोमा भवर यांच्या घराची पत्रे पूर्णतः उधवस्थ झालेली आहेत अन्न धान्य सर्व काही खराब झाले आहेत नुकतेच तोंडावर आलेले घरातील विवाह कार्यक्रमासाठीचे खरेदी वाया गेल्याने सोमा भवर हे सध्या चिंतेत आहेत मात्र केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी फोन करून सांगितल्याने तशा पंचनाम्यासाठीच्या सूचना तात्काळ तहसीलदार यांना केल्याचे सांगितले आहेत.
COMMENTS