Homeताज्या बातम्यासंपादकीय

चीन – दलाई लामा आणि …….. 

गेल्या आठवड्यात अरूणाचल प्रदेशातील तीन विभागांत चीन ने नाव बदलून आपला दावा केला. याविरोधात देशात मोठ्या प्रमाणात वादंग सुरू आहे. त्यावर केंद्रीय

अंगणवाडी शिक्षिका : आंदोलन आणि प्रश्न !
शह-प्रतिशह !  
राजकारणाचे सत्ताकारण आणि सामाजिक शक्ती ! 

गेल्या आठवड्यात अरूणाचल प्रदेशातील तीन विभागांत चीन ने नाव बदलून आपला दावा केला. याविरोधात देशात मोठ्या प्रमाणात वादंग सुरू आहे. त्यावर केंद्रीय सत्ताधारी त्यावर कोणतेही स्पष्टीकरण देत नसताना गृहमंत्री अमित शहा यांच्या अरूणाचल प्रदेश दौऱ्यावर थेट चीनने आक्षेप घेतला. चीन एवढ्यावरच थांबला नसून त्यांनी आमच्या प्रदेशात घुसपीठ करण्याचं कारण नसल्याचेही बजावले आहे. याचा अर्थ चीनने अरुणाचल प्रदेशावर केलेला कब्जा, हा यातून स्पष्ट होतो. मात्र, या बाबीची फार वाच्यता होऊ नये म्हणून, दुसरा वाद उभा करण्यात आला; आणि एका व्हिडिओच्या अनुषंगाने त्यावर मोठा  गहजब करण्यात आला. म्हणजे एका बाजूला चीन आणि भारत यांच्या मधला हा संघर्ष समोर येऊ नये, किंबहुना, त्यावर पडदा पडावा अशाच अनुषंगाने तिबेटचे निर्वासित नेते तथा धर्मगुरू दलाई लामा यांच्या व्हिडिओचा बाऊ करण्यात आला. दलाई लामा यांच्या स्पर्शासाठी अनेक लोक त्यांच्याकडे जात असतात हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथील त्यांच्या मठाला अनेक लोक केवळ त्यांच्या स्पर्शासाठी भेट देत असतात. महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा एका लहान मुलाचा चुंबनाचा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला. अर्थात त्यासाठी दलाई लामा यांनी स्वतः माफी मागितली. परंतु याचवेळी या व्हिडिओचा संदर्भ नेमका का आला? याचा विचार करणे फार महत्त्वाचे आहे. एक तर दलाई लामा यांना चीनचा कायम विरोध राहिला आहे. दलाई लामा हे भारताच्या भूमीवर असणं हे चीनला पसंद नाही. त्यामुळे एनकेन प्रकारे त्यांच्या विरोधात भूमिका घेणे किंवा त्यांच्या विरोधात षडयंत्र करणं आणि आता त्यांना बदनाम करणं इथपर्यंत चीनचा प्रवास होऊ पाहतो आहे.  त्यात दोन गोष्टी साध्य होताना दिसतात. एक तर चीनचा दलाई लामा यांना बदनाम करून येणाऱ्या काळात त्यांच्या विरोधात अर्थात तिबेट निर्वासितांच्या विरोधात काही भूमिका घेणे शक्य व्हावे, हा त्यांचा उद्देश असावा.  त्यांना वर्तमान सत्ताधाऱ्यांची मदत झाली तर ते चांगलंच आहे, असा विचार चीन करतो आहे. चीन एका बाजूला भारताच्या एका भागावर कब्जा करीत असताना चीनला आंतरराष्ट्रीय पातळीवर खरे आव्हान देऊ शकेल – वैचारिक दृष्ट्या – ते व्यक्तिमत्व म्हणजे दलाई लामा. म्हणून दलाई लामांना कुठल्यातरी अनुषंगाने बदनाम करावं, या हेतूनेच हा व्हिडिओ या प्रसंगात बाहेर आल्याचे दिसते. चीनचे भारताच्या गृहमंत्र्यांना अरुणाचल प्रदेशामध्ये न येण्याविषयी बजावणं आणि त्याचवेळी दलाई लामा यांचा बदनामी करणार आहे व्हिडिओ प्रसारित होणं या दोन्ही घटनांमध्ये निश्चितपणे कार्यकारण भाव आहे. दलाई लामा हे जागतिक पातळीवर अतिशय पवित्र म्हणून मान्य केले गेलेले धार्मिक नेते आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी एखाद्या बाबतीत गदारोळ हा प्रकार त्यांच्या बदनामीचा षड्यंत्रात्मक डावपेच रचनेचा भाग असू शकतो.  आजपर्यत दलाई लामा यांनी भारतीय भूमीवर वास्तव्य  करीत जगाच्या अन्य देशातून चीनला कायम आव्हान केले आहे. चीनला आव्हान देण्यासाठी दलाई लामा यांनी अमेरिकेच्या भूमीचा नेहमीच वापर केला आहे. अमेरिका ही जगातील महाशक्ती असल्यामुळे चीनला ते नेहमीच खटकत आले आहे. शिवाय, भारताने तिबेटची निर्वासित नेते म्हणून दलाई लामा यांना आश्रय देऊ नये, कारण त्यांची मागणी ही स्वतंत्र तिबेटची आहे आणि स्वतंत्र तिबेट देणं हे चीनला आजही मान्य नाही. कारण तिबेट हा प्रदेश पूर्णपणे चीनव्याप्त आहे. किंबहुना तो चीनचा अविभाज्य भाग आहे, असे चीन सांगते. त्यामुळे या आंतरराष्ट्रीय प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी किंवा तो प्रश्न कायमचा दाबून टाकण्यासाठी दलाई लामा यांना भारतीय भूमीत बदनाम करण्याचा हा डाव एक प्रकारचा आंतरराष्ट्रीय डावपेच असू शकतो, हे नाकारले जाऊ शकत नाही. पण त्याच वेळी देशाच्या केंद्रीय गृहमंत्र्याला आपल्याच देशाच्या भूमीवर जाण्यास चीन आक्षेप घेतो आहे, आणि ही गोष्ट देशवासीयांना माहीत होऊ नये, यामुळे प्रसारमाध्यमांनी दलाई लामांच्या व्हिडिओला अधिक तूळ दिली आहे.

COMMENTS