Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समाज बदलासाठी काय पणाला लावणार

फुले-आंबेडकरी युवा संमेलन : जेष्ठ विचारवंत गौतमीपुत्र कांबळे यांचे प्रतिपादन

बीड प्रतिनिधी - समाज परिवर्तन ही काही साधी बाब नाही. राजा ढाले यांना फुले- आंबेडकर हे नाव घेण्यासाठी 25 ते 30 वर्ष संघर्ष करावा लागला. आज फुले- आ

पाटण बलात्कार प्रकरणातील आरोपींची नावे जाहीर करून कडक शिक्षा द्यावी
रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार
NEET परीक्षेत मुलींच्या थेट अंतर्वस्त्रांची केली तपासणी

बीड प्रतिनिधी – समाज परिवर्तन ही काही साधी बाब नाही. राजा ढाले यांना फुले- आंबेडकर हे नाव घेण्यासाठी 25 ते 30 वर्ष संघर्ष करावा लागला. आज फुले- आंबेडकर चळवळ म्हणून जो उल्लेख केला जातो त्याचे श्रेय राजा ढाले यांचे आहे. माणूस म्हणुन जगण्यासाठी आपण जात, धर्म, लिंग, ज्ञान, वर्ण या बाबी वजा कराव्यात. रंगावरती अधिकार चित्रकारांचा आहे, त्यामुळे रंगावर राजकारण कुणीही करू नये. जातीधर्माचे प्रतीके आणि प्रतिमा टाकून दिल्या पाहिजेत. पंढरपूरचा विठ्ठल दुसरा तिसरा कुणी नसून बुद्ध आहे असे 1950 ला बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आणि 1956 ला वार्‍या करू नका असे ते म्हणतात. विद्वान लोकांनी केलेले भवरे आणि चकवे ओळखावे लागतात. ज्याला समाज बदलायचा आहे त्याला समाजाचे आकलन असावे लागते. असे परखड विचार मांडून  समाज बदलासाठी आपण काय पणाला लावणार आहात? असा सवाल फुले- आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ विचारवंत गौतमीपुत्र कांबळे यांनी यांनी उपस्थित केला.

 बाभळगाव ता. माजलगाव येथे अनिल डोंगरे यांच्या पुढाकारातून शनिवार दि. 8 रोजी फुले- आंबेडकर विचारधारेच्या युवकांचे भव्य एकदिवशीय युवा संमेलन संपन्न झाले. यावेळी संमेलनाला मार्गदर्शन करतांना जेष्ठ विचारवंत गौतमीपुत्र कांबळे बोलत होते. कार्यक्रमाला सतीश बनसोडे, सुभाष साळवे, डॉ. अशोक गायकवाड, प्रा. विक्रम धनवे, बाबासाहेब वाव्हळे या फुले- आंबेडकरी चळवळीच्या अभ्यासकांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलतांना गौतमीपुत्र कांबळे म्हणाले की, लोकशाहीमध्ये लोकसंख्येला महत्त्व असते आणि त्यामुळे प्रस्थापितांचे जात, लोकसंख्या हे भांडवल आहे. भारतामध्ये जातींनी विचार करण्याची प्रक्रिया बंद केली असे नव्हे तर विचार करण्याची प्रक्रिया विकृत केली आहे. असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतात आणि जगात जेवढी विद्वान माणसं होती ते प्रज्ञावान होतीच असे नाही. तत्वज्ञान हे स्वतःच्या पायाने पुढे चालले पाहिजे तरच ते टिकू शकते. तत्वज्ञान भ्रष्ठ झाले तर पिढ्या बरबाद होतात. तत्वज्ञान व ईतिहास हे आपले शस्रे आहेत. समाज बदलू नये म्हणून काही तत्वज्ञान काम करत असते. जे ज्ञान उपयोगाला येत नाही त्या ज्ञानाला उपयोग नाही. सांस्कृतिक एकतेवर सामाजिक एकता विसंबून असते. कार्यकर्त्यांना समाजाच्या स्थिती- गतीचे आकलन झाले पाहिजे. त्यासाठी हा युवक महोत्सव महत्वाचा असून असे युवक महोत्सव घेतले पाहिजेत. यातून परिवर्तनाची किंबहुना क्रांतीची सुरुवात होईल. आपल्याकडे भक्तीमूल्य क्रांतीच्या आड येणारे असते, त्यामुळे ज्याला कुणाला इथे क्रांती हवी आहे, त्याने लोकांच्या डोक्यातील भक्ती आणि श्रद्धा बाहेर काढली पाहिजे असेही गौतमीपुत्र कांबळे यांनी मत व्यक्त केले.जात हे एक भांडवल आहे. मार्क्सवाद्यांनी गरिबीचे भांडवल केले आहे. जगात माणसांनी माणसांना मारण्यासाठी हत्यारे तयार केले आहेत, हे प्रगतीचे लक्षण आहे की अधोगतीचे? असा प्रश्न उपस्थित करत बुद्धाच्या तत्वज्ञानाचे आकलन झाले पाहिजे, कारण बुद्धाचे तत्वज्ञान माणसाला विवेकाने, नीतीने जगण्यासाठी मार्गदर्शन करणारे आहे असेही गौतमीपुत्र कांबळे म्हणाले. दरम्यान सतीश बनसोडे यावेळी म्हणाले की, आपल्या देशातील सर्व समस्या जातीमुळे आहेत. माणूस आणि माणसाचे या जगातील नाते आपल्याला दुरुस्त करायचे आहे. माणसाने माणसासोबत माणसासारखे वागावे अशी अपेक्षा आहे.

समता, स्वातंत्र्य, न्यायाच्या आधारावर समाजाची निर्मिती करणे हे सेक्युलर मुव्हमेंटचे उद्दिष्ट आहे. आपले चळवळीतील बांधव स्वतः न घडता समाजाला घडवायला निघाले आहेत. अगोदर स्वतः घडणे आणि नंतर समाजाला घडवणे अशी प्रक्रिया घडली पाहिजे. ध्येय गाठण्यासाठी साधने आणि मार्ग माहित असणे आवश्यक असल्याचे सतीश बनसोडे यांनी सांगितले.यावेळी सुभाष साळवे, डॉ. अशोक गायकवाड, प्रा. विक्रम धनवे, बाबासाहेब वाव्हळे यांनी प्रभावीपणे आपली मांडणी केली. कार्यक्रमाला प्रा. डी. एल. माने, जेष्ठ पत्रकार सुधाकर सोनवणे, सुनील डोंगरे, बीडीओ बागडे, बाळासाहेब सूर्यवंशी, विधीज्ञ राजेश शिंदे, सचिन देशमाने, युवराज सोनवणे, हनुमंत मस्के, सुनील वाव्हळकर, नवनाथ कांबळे, प्रा. राजेंद्र कोरडे, रत्नाकर डोंगरे, बाळासाहेब सोनटक्के, सर्जेराव मस्के, विकास बनसोडे, विकास निकाळजे, रत्नाकर डोंगरे, सुनील वाव्हळ, हनुमंत पाईक, हनुमंत मस्के, विजय गायकवाड, माणिक ब्रिनगे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बाळासाहेब जावळे,  यांनी केले. सूत्रसंचलन सुरज निकाळजे तर आभार प्रदर्शन सिद्धार्थ मायंदळे यांनी मानले. या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ठ्य असे होते की, कार्यक्रमाला दिडशेच्या पुढे कार्यकर्ते उपस्थित होते, सर्व कार्यकर्ते युवक होते आणि ते जिल्हाभरातून आलेले होते. ही किमया अनिल डोंगरे यांच्या चळवळीतील योगदानाची साक्ष असल्याचे सिद्ध झाले आहे.


चळवळीपासून काही नडलंय का?- चळवळ ही जर एक साखळी असेल तर साखळीच्या सर्वच कड्या सारख्या ताकतीच्या पाहिजेत, एक देखिल कमकुवत नको. विचार- नेता- कार्यकर्ता अशी एक साखळी असावी लागते, विचाराची जागा नेत्याने घेतली की, कार्यकरत्याचे मातेरे होते. आम्ही काय करतोस याचे आम्ही मूल्यमापन केलेच नाही ते केले पाहिजे. आजचे सामाजिक वातावरण गतिशिल विरुद्ध स्थितिशिल, अनित्यवाद विरुद्ध शाश्वतवाद असे आहे. ज्याला बदलायचे तो बदलायला तायार होत नाही. चळवळीत तुम्ही जेवण करून येणार की, जेवायला चळवळीत येणार? जेवायला चळवळीत आलात तर तुम्ही सारी चळवळच खाऊन टाकलं. म्हणून जीवन जगत असतांना चळवळीवाचून तुमचं काही नडलंय- अडलंय का? असा सवाल जेष्ठ विचारवंत गौतमीपुत्र कांबळे यांनी उपस्थित केला.

COMMENTS