Homeताज्या बातम्यादेश

कायदामंत्री किरेन रिजिजू अपघातात थोडक्यात बचावले

जम्मू : केंद्रीय कायदेमंत्री किरेन रिजिजू यांच्या कारला ट्रकने धडक दिली. या अपघातात रिजिजू सुरक्षित असून थोडक्यात बचावलेत. ही घटना जम्मू-काश्मीरच

शिराळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध; राष्ट्रवादी-14 तर भाजप 4 राष्ट्रवादीची सत्ता कायम
हँडल न पकडता रस्त्याच्या मधोमध चालवत होता दुचाकी;पहा व्हिडिओ | LOK News 24
पाटपाण्याच्या नियोजनाला अधिकार्‍यांची आडकाठी

जम्मू : केंद्रीय कायदेमंत्री किरेन रिजिजू यांच्या कारला ट्रकने धडक दिली. या अपघातात रिजिजू सुरक्षित असून थोडक्यात बचावलेत. ही घटना जम्मू-काश्मीरच्या रामबन येथे घडली. या अपघातापूर्वी किरेन रिजिजू यांनी ट्विट करून आपल्या प्रवासाची माहिती दिली होती. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, मी आता जम्मूहून उधमपूरला जातोय. तेथील कायदेशीर सेवा शिबिरात सहभागी व्हावे लागेल. माझ्याशिवाय अनेक न्यायाधीश आणि एनएएलएसएची टीमही या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. या क्षणी, मी देखील या प्रवासातील सर्वोत्तम रस्त्याचा आनंद घेत असल्याचे रिजिजू यांनी आपल्या संदेशात नमूद केले होते. त्यानंतर रिजिजू यांच्या वाहनाला ट्रकने धडक दिल्याची माहिती पुढे आली. या अपघाताशी  संबंधित एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झालाय. किरेन रिजिजू ज्या कारमध्ये बसले आहेत त्या कारला ट्रकने धडक दिल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. या धडकेनंतर किरेन रिजिजू यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले सुरक्षा कर्मचारी त्या गाडीकडे धावत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहेत. सुरक्षा कर्मचारी कारजवळ पोहोचताच किरेन रिजिजू त्यांच्या कारमधून उतरले आणि उभे राहिले. या व्हिडीओमध्ये रिजिजू यांना पाहून त्यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नसल्याचे दिसून येत आहे. त्याच्यासोबत त्या गाडीतील इतर लोकही सुरक्षित आहेत. सध्या स्थानिक पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

COMMENTS