केज प्रतिनिधी - केज शहरातील महात्मा फुले नगर येथे भीम जन्मोत्सव 2023 निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष
केज प्रतिनिधी – केज शहरातील महात्मा फुले नगर येथे भीम जन्मोत्सव 2023 निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष विवेक बनसोड उपाध्यक्ष अल्ताफ शेख तर सचिव तात्या गवळी सहसचिव रमेश लांडगे कोषाध्यक्ष अशोक धिवार तर जयंती उत्सव समितीचे मार्गदर्शन नगरसेवक सुमित बप्पा शिंदे असुन या कार्यक्रमाचे आयोजन एल.एफ.सी. ग्रुप व मिलिंद सागर युवा प्रतिष्ठान फुलेनगर केज यांनी केली आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की केज येथील फुलेनगरमधील भिमजन्मोत्सव या वर्षी आगळावेगळा साजरा होत असुन 14 एप्रिल अगोदर 5 दिवस अनेक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले असुन त्यामध्ये दिनांक 9 एप्रिल 2023 रोजी सकाळी 6:00 वाजल्यापासून ते रात्री 12:00 वाजेपर्यंत 18 तास वाचन करुन महामानवास अभिवादन. दिनांक 10 एप्रिल 2023 रोजी सकाळी रक्तदान शिबिर, रात्री भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मूर्ती अनावरण सोहळा व शाहिर शितलताई साठे आणि शाहिर सचिन माळी यांचा नवसांन महाजलसा कार्यक्रम दिनांक 11 एप्रिल 2023 रोजी सकाळी सामान्यज्ञान व हस्ताक्षर स्पर्धा, रात्री कमलाकर कांबळे सर यांचे डॉ. बाबासाहेबांचे तीन गुरु समाज प्रबोधन व्याख्यान कार्यक्रम, दिनांक 12 एप्रिल 2023 रोजी सकाळी निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, रात्री नृत्य स्पर्धा, दिनांक 13 एप्रिल 2023 रोजी सकाळी रांगोळी स्पर्धा तर रात्री झी युवा संगीत सम्राट फेम अजय देहाडे प्रस्तुत तुफानातले दिवे भीम गीतांचा कार्यक्रम असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी या कार्यक्रमास केज तालुक्यातील व शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. आणि विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा. असे आवाहन भीम जन्मोत्सव कमिटी व या कार्यक्रमाचे आयोजक एल. एफ. सी. ग्रुप, मिलिंद सागर युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आले आहे.
COMMENTS