Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अयोध्या दौर्‍यावर

मुंबई/प्रतिनिधी ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून दोन दिवसांच्या अयौध्या दौर्‍यावर रवाना होणार असून, या दौर्‍यात शिवसेना जोरदार शक्तीप्रदर्शन करण

सफाई कर्मचारी हा मुंबईचा खरा हिरो
मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देणार
जिल्हाधिकारी देणार शासकीय रुग्णालयांना नियमित भेटी

मुंबई/प्रतिनिधी ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून दोन दिवसांच्या अयौध्या दौर्‍यावर रवाना होणार असून, या दौर्‍यात शिवसेना जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता असून, हा दौरा यशस्वी होण्यासाठी भाजपचे नेते मैदानात उतरले आहे. भाजपने महाराष्ट्रातील दोन नेत्यांवर हा दौरा यशस्वी करण्यासाठी जबाबदारी सोपवली आहे. भाजपचे संकट मोचक गिरीश महाजन आणि आशिष शेलार यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिवाय त्यांच्या मदतीसाठी उत्तर प्रदेशातील भाजप नेतेही असणार आहेत.
अयोध्येत मोठे शक्ती प्रदर्शन करुन शिंदेंना बळ देण्याचे काम भाजप करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येत राम मंदिरात जाऊन महाआरती करणार आहेत. नंतर शरयू नदीवर महाआरती करणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. या दौर्‍याची जय्यत तयारी झाली आहे. शिंदे गटाचे अनेक पदाधिकारी आधीपासूनच अयोध्येत दाखल झाले असून ते या दौर्‍याची वातावरण निर्मिती करत आहेत. याचाच एक भाग म्हणून पहिल्यांदाच अयोध्येत एकनाथ शिंदे यांचे पोस्टर लागले आहेत. चलो अयोध्या प्रभू श्रीरामजी का सन्मान, हिंदुत्व का तीर कमान असा मजकूर या पोस्टर्सवर लिहिण्यात आला आहे. ठिकठिकाणी शिवसेनेचे झेंडे लावण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण वातावरण भगवामय झालं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार, खासदार पदाधिकारी, हजारोच्या संख्येने अयोध्येत दाखल होत आहेत. त्याच्या नियोजनाचे काम उत्तर प्रदेशातील भाजप पदाधिकार्‍यांना दिले आहे.

COMMENTS