Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाळवंडी जि.प.सर्कल प्रा.राऊत लढवणार-भीमराव कुटे

बीड प्रतिनिधी -  नाळवंडी सर्कल मधील विविध गावातील विविध समस्या सोडवण्यासाठी आत्तापर्यंत निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्यांनी कुठलाही प्रयत्न के

येवला येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत संविधान मंदिराचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते उदघाटन
विरोधी पक्षनेता ठरेल त्यादिवशी काँग्रेसमध्ये स्फोट ः दरेकर
हनुमानाच्या जन्मस्थळांचा वाद जुनाच ; पाच ठिकाणी जन्म झाल्याच्या पुराणकथा

बीड प्रतिनिधी –  नाळवंडी सर्कल मधील विविध गावातील विविध समस्या सोडवण्यासाठी आत्तापर्यंत निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्यांनी कुठलाही प्रयत्न केलेला नाही.नाळवंडी जिल्हा परिषद सर्कलची परिस्थिती  बिकट करून ठेवली आहे. सर्कल मधील जिल्हा परिषद शाळेच्या समस्या, अंगणवाड्यांच्या समस्या, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समस्या, ग्रामपंचायत कार्यालयांच्या समस्या, तलाठी कार्यालयांच्या समस्या, जिल्हा परिषद अंतर्गत च्या रस्त्याच्या समस्या, त्या रस्त्यावरील फुलांच्या समस्या, जिल्हा परिषद सर्कल मधील गावठाणातील व शेतातील विजेच्या समस्या, जिल्हा परिषद सर्कल मधील गावातील पिण्याच्या व सांडपाण्याच्या समस्या, गावातील पथदिव्यांच्या नाल्यांच्या व रस्त्यांच्या समस्या, याव्यतिरिक्त निराधार, अपंग, वृद्ध, विधवा महिला, निराधार बालक, बालकामगार यांच्या समस्या सोडवण्यासाठी आतापर्यंतचे जिल्हा परिषद सदस्य अपयशी ठरलेले आहेत. उलट त्यांनी या समस्या बाजूला ठेवून स्वतःचा स्वार्थ साधण्याचे काम केलेले आहे. समाज हिताचे एकही काम या सदस्यांनी केलेले नाही. या उलट स्वतःचे बंगले बांधून समाजाच्या विकासाचा निधी लाटण्याचे काम आतापर्यंतच्या जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांनी केले आहे.

नाळवंडी सर्कल मध्ये पूर्वीपासूनच सन 2010 म्हणजे शिक्षण झाल्यापासून प्रा.ज्ञानेश्वर(अण्णा)राऊत यांनी सर्कलमधील विविध समस्यांना वाचा फोडण्याचे काम करून विविध समस्या सोडवण्याचे काम मातृभूमी सामाजिक प्रकल्पाच्या माध्यमातून व सन 2012 पासून आम आदमी पार्टी, बीड च्या माध्यमातून सातत्याने केले आहे व ते आजही चालू आहे. प्रा.अण्णासाहेब राऊत हे 2012 पासून आज पर्यंत आम आदमी पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते बनवून सामाजिक प्रश्नावरती लढा देत आहेत. सध्या ते आम आदमी पार्टीचे बीड जिल्हा संघटक ही जबाबदारी पार पाडत आहेत. कुठल्याही प्रकारचे संवेधानिक राजकीय पद नसताना आम आदमी पार्टी बीडच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांचे वैयक्तिक व सार्वजनिक प्रश्न सोडवण्याचं काम प्रा.अण्णासाहेब राऊत यांनी केले आहे. विविध गावात ग्रामस्वच्छता अभियान,विविध गावात आरोग्य व शिक्षण विषयक जनजागृती कार्यक्रम, काव्य संमेलने, विविध गावातील गुणवंतांचा मातृभूमीच्या माध्यमातून सन्मान व सत्कार, पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी मातृभूमी शिक्षण संस्थेची स्थापना त्या माध्यमातून नर्सरी पासून बारावीपर्यंतचे शिक्षण मोफत व नाममात्र शुल्कामध्ये उपलब्ध करून देण्याचे काम प्रा.अण्णासाहेब राऊत यांनी केले आहे व ते अविरत चालू आहे.

अण्णासाहेबांनी मधील विविध गावातील जिल्हा परिषद शाळांच्या व वस्ती शाळांच्या विकासासाठी सातत्याने प्रशासनाला जाब विचारण्याचे काम केले आहे. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून त्यांना शिक्षणाबद्दल जागरूक करण्याचे देखील काम केले आहे. प्रा.अण्णासाहेब राऊत यांनी  जिल्ह्यात भ्रष्टाचार विरोधी व भ्रष्टाचार मुक्तीसाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक खेडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जिल्हासचिव रामधन जमले, जिल्हासोशल मीडियाप्रमुख रामभाऊ शेरकर, जिल्हाकोषाध्यक्ष कैलासचंद्र पालीवाल,जिल्हा उपाध्यक्ष अक्रमभाई शेख, शहराध्यक्ष सय्यद सादिक, कार्यकारणी सदस्य आजम खान, मिलिंद पाळणे, देवा गुंजाळ यांच्या सहकार्याने  प्रा.अण्णासाहेबांनी नगरपालिका प्रशासनाला व जिल्हापरिषद प्रशासनाला धारेवर धरून असंख्य विकास कामांना गती देण्याचे काम केले आहे. त्याचबरोबर समाज प्रबोधन कार्यक्रम हाती घेऊन महाराष्ट्रभर वेगवेगळ्या जयंती उत्सव कार्यक्रमातून महापुरुषांचे जीवन चरित्र सर्वसामान्यांना सांगण्याचे काम अण्णासाहेबांनी केले आहे. अण्णासाहेबांनी विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देखील प्रबोधन करण्याचे कार्य सातत्याने चालू ठेवले आहे. नाळवंडी सर्कलला अण्णासाहेबांसारखा क्रांतिकारी विचाराचा जिल्हापरिषद सदस्य उमेदवार निवडणुकीमध्ये लाभणार आहे. अण्णासाहेब निवडणूक रिंगणात उतरणार ही गोष्ट म्हणजे नाळवंडी सर्कलचे सौभाग्य ठरणार आहे. अण्णासाहेबांच्या दूरदृष्टी नेतृत्वाला न्याय देणे हे नाळवंडी सर्कलमधील मतदारांचे कर्तव्य आहे. त्याचबरोबर पंचायत समिती साठी त्यांच्यासोबत दोन उमेदवार देखील अण्णासाहेब निवडणुकीमध्ये उतरवणार आहेत त्यासाठी उमेदवारांची चाचणी देखील चालू आहे. निवडणुकीनंतर अण्णासाहेब निश्चितच नाळवंडी जिल्हा परिषद सर्कलचा विकास करतील व जिल्हा परिषद सर्कल मधील सर्व समस्यांना वाचा फोडून त्या समस्या पूर्ण करतील याबद्दल शंका वाटत नाही.नाळवंडी सर्कल मध्ये इतिहास घडणार आहे; कारण आम आदमी अण्णासाहेब जिल्हा परिषद निवडणूक लढणार आहे! अण्णासाहेबांच्या माध्यमातून नाळवंडी जिल्हा परिषद सर्कल मधील सर्व समस्या जाणून घेण्यासाठी अण्णासाहेबांनी प्रत्येक गावात जाऊन तेथील समस्या जाणून घेण्याची मोहीम हाती घेतली आहे. यामुळे त्यांच्यासोबत आम आदमी पार्टीचे नाळवंडी सर्कल प्रमुख दत्ता सुरवसे बीड जिल्हा तालुकाध्यक्ष भीमराव कुटे मा.दादासाहेब सोनवणे,जामकर मामा,नागरगोजे मामा,गव्हाणे मामा, लक्ष्मण वडणे मामा व आम आदमी पार्टीचे युवाजिल्हासंघटकमंत्री प्रवीण पवार आदी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हाती घेतले आहे.

COMMENTS