Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

औंदाणे ग्रामपंचायतीच्या दिव्यांग व मागासवर्गीय निधीतून साहित्य वाटप

दिव्यांग बांधवास प्रत्येकी ३५०० रुपये तर मागासवर्गीय निधीतून टेबल फॅन वाटप

सटाणा: तालुक्यातील औंदाणे ग्रामपंचायतीच्या दिव्यांग पाच टक्के निधीतून तीन दिव्यांग बांधवांना  प्रत्येकी ३५०० रूपयांच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले

सत्कार्यामुळे माणूसच माणसांचे जग सुखी करतो ः प्राचार्य टी.ई. शेळके
पीएम किसान योजनेच्या लाभासाठी ई-केवायसी पूर्ण करावी
महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने पुरोगामी बनवण्यासाठी ‘बसपा’च पर्याय

सटाणा: तालुक्यातील औंदाणे ग्रामपंचायतीच्या दिव्यांग पाच टक्के निधीतून तीन दिव्यांग बांधवांना  प्रत्येकी ३५०० रूपयांच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच ग्रामपंचायतीच्या पंधरा टक्के मागासवर्गीय खर्चातुन पंचवीस लाभार्थींना टेबल फँनचे वाटप करण्यात आले. 

त्याप्रसंगी त्यांना धनादेश व फँन देताना लोकनियुक्त सरपंच भरत  पवार, उपसरपंच मनीषा गरुड, ग्रामपंचायत सदस्या कल्पना खैरनार, प्रमिलाबाई निकम, सिंधुबाई जाधव,  प्रहार शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष तुषार खैरनार, ग्रामपंचायत  सदस्य प्रवीण पवार, भागुजी पिंपळसे, सामजिक कार्यकर्ते देविदास जाधव, ग्रामसेवक योगेश सुर्यवंशी, प्रहार शाखाध्यक्ष महेश निकम, योगेश गरुड, यशोधन निकम, सोसायटीचे माझी सभापती संजय पवार, माजी सरपंच कैलास निकम, शिपाई साहेबराव निकम, सुभाष गांगुर्डे, गणेश निकम आदींसह लाभार्थी व ग्रामस्थ उपस्थितीत होते.

प्रतिक्रिया: ग्रामपंचायतीच्या दिव्यांग निधी मधुन  जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांना निधी देण्याचा प्रयत्न करणार आहोत अजुन काही दिव्यांग बांधवांना वाटप करण्यात येणार आहे. भरत पवार, लोकनियुक्त सरपंच औंदाणे औंदाणे ग्रामपंचायतीच्या सदस्या या नात्याने गावातील शिवारातील निराधार अनाथ दिव्यांग या सर्वांना मदत मिळून देण्यासाठी मी कायम तत्पर राहील

COMMENTS