Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पशु-पक्ष्यांना केली पाण्याची सोय

लातूर प्रतिनिधी - नाना नानी उद्यान (पार्क) परिसरात प्रभुराज प्रतिष्ठान लातूरच्या वतीने झाडांना येळणी बांधून पशु पक्ष्यांच्या पिण्याच्या पाणीची स

सरपंच सौ. रेशमा गंभीरे महात्मा फुले समाजरत्न राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
चिखली येथे दारु चोरून विकणार्‍या इसमास अटक
राष्ट्रीय महामार्गावरील गिट्टीच्या ढिगार्‍यामुळे अपघातात वाढ

लातूर प्रतिनिधी – नाना नानी उद्यान (पार्क) परिसरात प्रभुराज प्रतिष्ठान लातूरच्या वतीने झाडांना येळणी बांधून पशु पक्ष्यांच्या पिण्याच्या पाणीची सोय करण्यात आली. त्या निमित्ताने पशु पक्षांची सेवा करण्याचा नवा संकल्प करण्यात आला. पशु-पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी प्रभुराज प्रतिष्ठाणच्या वतीने झाडानां येळणी बांधून उपस्थित नागरिकांना येळणी वाटप करण्यात आले. प्रत्येक मानवांनी आपल्या अंगणात व परिसरात पक्ष्यासाठी पाणी पिण्याची सोय करावी त्याने कडक्याच्या उन्हात पक्ष्याची पाणी पीण्यासाठी भटकंती होनार नाही आपण पशु पक्ष्यांसाठी केलेली सोय सामाजिक कार्य हे पशु पक्ष्यांच्या समुहाला आधार देणारे ठरेल. तसेच उपस्थित नागरिकांना व तरुण मित्रांना आई-वडिलांची सेवा व जेष्ठ नागरिकांची आणि पशु पक्ष्यांची, मुक्या जनावरांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा ठरेल असे महान कार्य करण्याचा संकल्प केला.
यावेळी प्रभुराज प्रतिष्ठाणचे अ‍ॅड. अजय कलशेट्टी, समाजसेवक संजय जमदाडे, संजय बागडे, ओम लोहिया, पुरंषोत्तम करवा, शिरीष माळी, पारस चापसी, शिवा धुळे, डॉ. श्रीराम कोळेकर, शिवापा हुंडेकरी, बंडाप्पा जवळे, मोतिराम कदम, शेख हुसेन, सुनील कोटलवार, अशोक पंचाक्षरी, सचिन गोलावार, एस. एस. पाटील, राजू सैदापुरे, हरीश रिजवानी, प्रफुल म्हेत्रे, शंकर पाटील, बाळू भुतडा, प्रकाश दाने, सचिन बावगे आदी उपास्थित होते.

COMMENTS