Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हादगाव- निवघ्यातील अवैध धंद्यांना अभय कोणाचे ?

अवैध धंद्यामुळे तरुण वर्ग वळतोय गुन्हेगारीकडे

नांदेड - नांदेड जिल्ह्यातील उत्तरेकडील भाग हदगाव तालुका तसा सुपीक हादगाव शहर लागूनच श्री दत्त बडी देवस्थान. येथे अनेक भाविक भक्त आणि अध्यात्मिक ल

अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी उत्साहात मतदानास सुरवात 
नंदुरबार राज्यातील पहिला अमली पदार्थ मुक्त जिल्हा
यात्रेनिमित्त जोतिबा डोंगर गुलालाने न्हाऊन निघाला

नांदेड – नांदेड जिल्ह्यातील उत्तरेकडील भाग हदगाव तालुका तसा सुपीक हादगाव शहर लागूनच श्री दत्त बडी देवस्थान. येथे अनेक भाविक भक्त आणि अध्यात्मिक लोक राहतात. हदगाव तालुक्याच्या शेजारी लागू  असलेला उमरखेड तालुका .या हादगाव  आणि उमरखेड या तालुक्याच्या मधून वाहणारी पेनगंगा नदी. मात्र याच भूमीला आता गुन्हेगाराच आणि  अवैध धंद्याचे ग्रहण लागले आहे.त्यामुळे यातून गुन्हेगारी वाढत आहे .अवैध धंद्यावाल्याची चांगली चलती असल्याचे दिसून येत आहे .मात्र ही चलती कुणाच्या  कृपाआशीर्वादाने सुरू आहे. ते जगजाहीर आहे. मात्र त्याविरुद्ध बोलण्याची कुणाची हिंमत नाही अशीच परिस्थिती आहे.                                     हादगाव शहरात आणि निवघा परिसरात अवैध धंदे चांगले तेजीत सुरू आहेत .या शहरातील किराणा दुकान. पान टपर्‍यावर गुटखा सहज प्राप्त होतो आणि बेकायदा अवैध   दारूची विक्री    राजरोसपणे सुरू आहे .तसेच  नांदेड -वारंगा रोडवरील धाब्यावर अवैधरीत्या मागच्या बाजूने सर्रास पैकी देशी- विदेशी अवैध दारू विकल्या जाते . खुलेआम मटका. वाळू तस्करी आणि जुगार स्थानिक पोलीस प्रशासनाच्या  कृपाआशीर्वादाने जोमात सुरू आहे .जर या धंद्याविरुद्ध कुण्या सर्वसामान्य माणसाने आवाज उठवलाच तर, आमची कुणी वाकडे करू शकत नाही असा दमच अवैध धंदेवाले देतात .कारण ज्यांच्या जोरावर सर्व अवैध धंदे सुरू आहे. त्यांचा आशीर्वाद असल्यामुळे आपले कुणी वाकडे करू शकणार नाही असा या अवैधंद्यावाड्याचा होरा दिसून येतो .त्यामुळे शहरात आणि ग्रामीण भागात अवैध धंदे जोमात सुरू आहे. पोलीस ठाण्यातीलच  काही कर्मचार्‍यांचे अवैध धंदेवाल्याशी आर्थिक हीच सबंध असल्याची नागरिकांची दबक्या आवाजात चर्चा आहे .मात्र कुणाच्या आशीर्वादाने हे अवैध धंदे चालतात हे सांगण्यास कुण्या ज्योतिषाची गरज पडणार नाही. श्री क्षेत्र दत्तबर्डी देवस्थान आणि केदारगुडा हे देवस्थान या तालुक्यात आहेत. अशा या पवित्र  भूमीत उपविभागीय कार्यालय असून येथील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची धुरा त्यांची आहे. मात्र सध्या या पवित्र पेनगंगेच्या तीराला अवैध व्यवसायाचा विळखा पडला आहे. हदगाव पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात अनेक समाजसेवी संघटना कार्यकर्ते अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी निवेदने, तक्रार. अर्ज देतात ,प्रसंगी उपोषण करतात .परंतु चार दिवस धंदे आदळ आपटीने बंद करून नोटंकी केली जाते .परंतु चार दिवसानंतर चित्र जसे थे होताना दिसून येत आहे. सध्या नांदेड जिल्ह्याला एक कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे मिळाले आहेत . गुन्हेगारीचे  समूळ  उच्चाटन करण्याची त्यांची प्रमाणिक इच्छाशक्ती असली तरी स्थानिक पोलीस अधिकारी किंवा गुन्हे अन्वेषण विभाग प्रमुख अवैध धंदे बंद करण्याचे धाडस दाखवीतील काय ? हा प्रश्न     अनुतरीत राहतोय.
जिल्हा पोलीस अधीक्षक याकडे लक्ष देतील का?
जिल्ह्याचे कर्तव्यतत्पर पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी आतापर्यंत मोठमोठ्या कारवाया केल्या. विविध गुन्हेगारास जेरबंद केले आहे. त्यांनी घटनास्थळाला ताबडतोब भेटी देऊन प्रत्यक्षरीत्या पाहणी केली. कायद्याने चूक केली अशा ठाणे इन्चार्ज इस्लापूर पोलीस स्थानकाच्या अधिकार्‍यांना  तात्काळ निलंबित केले. हिमायतनगर तालुक्यातील लाखोचा गुटखा पकडला. देगलूर सारख्या दरोड्यातील आरोपी पकडले. त्या ठिकाणी प्रत्यक्षरीत्या क्षणाचा विलंब न करता भेट देऊन आरोपी ही अटक केले ,मात्र निवघा- हादगाव शहरातील अवैध धंदे बंद होऊ शकले नाही. अवैध रेती आणि माती उत्खननावर कारवाई अपेक्षित आहे. सर्रास पैकी गुटखा आणि बस स्थानक परिसरात कल्याण -मुंबई मटका ,जुगार अड्डे , अवैध दारू विक्री चालू आहे,  कारण या अवैधंद्यामुळे तरुण युवक वाममार्गाला लागत आहे. तसेच पोलीस विभागाची प्रतिमा मलिन होत आहे.

COMMENTS