Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नागापूरचे रेणुकाई माळ देवस्थान गेले चोरीस ?

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू

अहमदनगर/प्रतिनिधी ः आजोबांचा मालकी हक्क असलेले नागापूर एमआयडीसी येथील रेणुकाई माळ देवस्थान चोरीला गेल्याची तक्रार त्यांचे नातू असलेले अंतोन गायकव

कृषी कंन्याचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
नगर-मनमाड महामार्गावरील अवजड वाहतूक आठ दिवस बंद
तटकरेंसारखा नटसम्राट पाहिला नाही

अहमदनगर/प्रतिनिधी ः आजोबांचा मालकी हक्क असलेले नागापूर एमआयडीसी येथील रेणुकाई माळ देवस्थान चोरीला गेल्याची तक्रार त्यांचे नातू असलेले अंतोन गायकवाड यांची आहे व हे देवस्थान परत मिळवून देण्याच्या मागणीसाठी सोमवारी (दि.3 एप्रिल) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप अनुसूचित जाती मोर्चा महिला आघाडीच्यावतीने कुटुंबीयांसह त्यांनी उपोषण केले. या उपोषणात शारदा अंतोन गायकवाड, आदिका गायकवाड, आरती गायकवाड, प्रिती गायकवाड, प्रतीक गायकवाड, धनराज गायकवाड, अर्जुन गायकवाड आदी सहभागी झाले होते.

याबाबत अंतोन गायकवाड यांनी सांगितले की, नागापूर, एमआयडीसी येथील सर्व्हे नंबर 29/1 ही जमीन आजोबा बाबू रामा, दगडू केसू गायकवाड व माझे नातेवाईक लक्ष्मण ठकू चांदणे यांच्या नावे होती. त्या जमिनीमध्ये ते शेती करुन कुटुंबाचा उदारनिर्वाह करीत होते. या जमिनीमध्ये रेणुकाईचा माळ देवीचे देवस्थान होते. त्या ठिकाणी मोठे वडाचे झाड पणजोबा केसू गायकवाड यांनी लावले होते. देवीची मनोभावी सेवा आजोबा, नातेवाईक, आई-वडील व इतर नातेवाईक करीत होते. दरवर्षी नवरात्र उत्सव साजरा करीत होते. नाशिक येथून रेणुकाईची पालखी आणून व यात्रा उत्सव साजरा करत असे. मात्र, 21 मे 1971 रोजी अहमदनगर औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र शासन यांनी ही जमीन अधिग्रहण केली. पण आजी-आजोबा, नातेवाईक यांनी रेणुकाईचा माळ देवी देवस्थान विकले नव्हते. त्यामुळे आम्ही दरवर्षीप्रमाणे नाशिक येथून पालखी आणून नवरात्र उत्सव साजरा करीत होतो. ती जमीन एका कंपनीने एम.आय.डी.सी.कडून विकत घेतली. अशाप्रकारे रेणुकाईचा देवी देवस्थान चोरीला गेले असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

कुटुंबीय मागासवर्गीय व अशिक्षित असल्याने आतापर्यंत कुठल्याही प्रकारची तक्रार केली नाही. सध्या त्या जागेत एक कंपनी चालत असल्याचे स्पष्ट करुन, रेणुकाई माळ देवस्थानची मौजे नवनागापूर ग्रामपंचायतला नोंद व्हावी व देवस्थान मूळ वंशजांना परत मिळवून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

COMMENTS