Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणतांबा रेल्वे स्थानकावर जलद गाडयांना थांबा मिळावा ः संध्या थोरात

पुणतांबा प्रतिनिधी ः पुणतांबा रेल्वे स्थानकावर जलद गाड्यांना थांबा मिळावा तसेच स्थानकावर प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी माजी जिल्हा

गोदावरी उजव्या-डाव्या कालव्यांचे काम प्रगतीपथावर – आ. आशुतोष काळे
माणिकपणे आणि माणुसकीने काम केल्याचे समाधान मोठे ः शंकरराव परदेशी
न्यू आर्टस महाविद्यालयात ग्रंथप्रदर्शन उत्साहात

पुणतांबा प्रतिनिधी ः पुणतांबा रेल्वे स्थानकावर जलद गाड्यांना थांबा मिळावा तसेच स्थानकावर प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य वकील संध्या थोरात यांनी सोलापूर रेल्वे डिव्हिजनल मॅनेजर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. त्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना काळात बंद करण्यात आलेल्या पॅसेंजर गाड्या सुरू करण्यात याव्यात तसेच कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस भुसावळ पुणे तसेच दादर शिर्डी साईनगर पंढरपूर या गाड्या पूर्वत सुरू करण्यात याव्यात पुणतांबा रेल्वे स्थानकाला जंक्शन चा दर्जा असला तरी गाड्यांना थांबा नाही त्यामुळे त्या जंक्शन स्टेशनचा काय उपयोग असा सवाल सर्वसामान्य नागरिकांपुढे उभा आहे.
रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यात यावे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र रेल्वे सुरक्षा बला ची चौकी सुरू करण्यात यावी पुणतांबा हे तीर्थक्षेत्र असून चांगदेव महाराजांचे समाधी स्थळ तसेच शिर्डीचे साईबाबा मंदिर जवळ असून पुणतांबा तीर्थक्षेत्र असल्यामुळे येथे येणार्‍या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे रेल्वे गाड्या बंद असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. बंद केलेल्या गाड्या पूर्व सुरू कराव्यात. त्यामुळे पुणतांबा रेल्वे स्थानकावर प्रवाशांची वर्दळ वाढून त्यांची सोय होईल अशी अपेक्षा थोरात यांनी व्यक्त केली आहे. रेल्वेच्या प्रश्‍नाबाबत लवकरच राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे खासदार सुजय विखे यांची भेट घेऊन पुणतांबाकारांची समस्या मांडणार असल्याचे थोरात यांनी स्पष्ट केले.

COMMENTS