Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे राजकारण तापले

शेवटच्या दिवशी 18 जागांसाठी 198 अर्ज दाखल

जामखेड/प्रतिनिधी ः शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय घेणारी जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अर्ज दाखल करण्याच्या शे

कोपरगावमध्ये दोन वर्षानंतर फुलणार ‘गोदाकाठ महोत्सव’
जोखमीचे काम करणारे सर्पमित्र प्रशिक्षण व सुविधांपासून वंचितच | आपलं नगर | LokNews24 |
नगर-कल्याण रोडवर भव्य फटाका मार्केट सुरु

जामखेड/प्रतिनिधी ः शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय घेणारी जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 18 जागांसाठी 277 अर्जांची विक्री झाली असून 198 अर्ज दाखल झाले आहेत. खर्‍या अर्थाने ही निवडणूक आमदार रोहित पवार व आ राम शिंदे यांच्यात दूरंगीच होणार आहे. तशी मोर्चेबांधणी उमेदवारांची जुळवाजुळव वेगात सुरू आहे. अनेजणांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
शिंदे फडणवीस सरकारच्या नव्या निर्णयामुळे उमेदवार म्हणून कोणालाही (फक्त शेतकरी हवा) निवडणुकीत उभे राहता येणार आहे.या निर्णयाने मतदारांची संख्या कमी आणि उमेदवारांची संख्या जास्त होईल. मतदार यादी पूर्वीसारखीच म्हणजे सोसायट्यांचे संचालक आणि ग्रामपंचायत सदस्य अशी राहील. मात्र यावेळी उमेदवारांची निवड  ही दोन्ही आमदारांसाठी मोठी धाडसाची प्रक्रिया ठरणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून आ रोहित पवार यांनी तीन वर्षांत कोट्यावधी रुपयांचा निधी मतदार संघात खेचून आणला, विकास कामांच्या माध्यमातून त्यांनी आपला राजकीय दबदबा जामखेड तालुक्यात निर्माण केला आहे. दरम्यान राम शिंदे यांना विधानपरिषदद्वारे पून्हा  आमदारकी मिळाली. लगेचच महाराष्ट्रात सत्ताबदल होऊन शिंदे- फडणवीसांची सत्ता आली. आ. राम शिंदे  यांनी राजकीय भरारी घेत मोठ्या प्रमाणावर विकास नीधी आणला. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये मोठा जोश भरला आहे. विधानसभेनंतर कृषी उत्पन्न बाजार समितीची ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक असल्याने दोन्ही आमदारांमध्ये मोठी काट्याची लढाई होणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे.

प्रा. सचिन गायवळ सर्व पक्षीयांना हवा असणारा चेहरा – शैक्षणिक क्षेत्राशी निगडित असलेल्या प्रा. सचिन गायवळ यांना जामखेड तालुक्यात मानणारा सर्व पक्षीय मोठा वर्ग आहे, त्यांचे राजकारणापलिकडे सर्वांशी आपुलकीचे संबध आहेत. राजकारणात प्रत्येक ठिकाणी गट हे असतातच. परंतु, प्रा सचिन गायवळ असे गट-तट हाताळण्यात अतिशय वाकबगार आहेत.समाजातील प्रत्येक घटकातील माणसाला मदत करत आपुलकीचे व जिव्हाळ्याचे संबंध ठेवत अनेकांना  त्यांनी मदतीचा हात दिला आहे, तरुणाईचा एक आश्‍वासक चेहरा म्हणून सध्या त्यांच्याकडे पाहिले जात आहे अनेक ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य तसेच सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व सदस्यांशी त्यांचा मोठा जनसंपर्क आहे, विशेषतः खर्डा गटातील 80%गावातील लोकं प्रा सचिन गायवळ यांना अनूकल आहेत.जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर होत असलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांची संख्या पाहता त्यांनी जर स्वतः जातीने लक्ष घातले  तर त्यांची भूमिका निर्णायक ठरू शकते.  त्यांच्या राजकीय ताकतीकडे दोन्ही दुर्लक्ष करून चालणार नाही, सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांपासून सामान्य कार्यकर्त्यांपर्यत त्यांचे असलेले संबध पाहता प्रा सचिन गायवळ कोणत्या पक्षाचे आहेत हे  उमगत नाही. त्यामुळे  कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शेवटच्या क्षणी प्रा.सचिन गायवळ हे आपले राजकीय वजन कोणत्या आमदाराच्या पारड्यात टाकतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

राळेभात बंधूचे राजकारण जमेचे- मागील बाजार समितीची निवडणूक आ. राम शिंदे यांनी राजकीय कौशल्य वापरून विरोधकांना बरोबर घेऊन जिंकली होती. तेव्हा रत्नदीप मेडिकल फाउंडेशन अ‍ॅन्ड रिसर्चचे अध्यक्ष डॉ भास्कर मोरे यांनी स्वतंत्र पँनल उभा करून सत्ताधार्‍यांची चांगलीच दमछाक केली होती. यावेळी अद्याप या निवडणूकीपासुन ते दूरच दिसत आहेत. तसेच जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमोल राळेभात हे राष्ट्रवादीत नाममात्र असून विखेंचेच खरे समर्थक असल्याचे बँकेच्या अध्यक्ष निवडणुकीत त्यांनी दाखवुन दिले आहे. सोईचे राजकारण करणारे राळेभात बंधु बाजार समिती निवडणूकीत जे आमदार शब्द देतील त्यांच्या बाजूने जाण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

COMMENTS