Homeताज्या बातम्यादेश

धक्कादायक! आठवीच्या विद्यार्थीनीचा शाळेतच हार्ट अटॅकने मृत्यू

गुजरात प्रतिनिधी - आठ वर्षाच्या मुलीचा शाळेतच हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. गुजरातमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाल

फोफसंडीत विशेष गुणगौरव व काव्यमैफल कार्यक्रम सोहळा उत्साहात
टीईटी घोटाळा : 25 किलो चांदी आणि दोन किलो सोने जप्त
राज्यसभेच्या 12 जागांसाठी निवडणूक जाहीर

गुजरात प्रतिनिधी – आठ वर्षाच्या मुलीचा शाळेतच हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. गुजरातमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून मुलीच्या पालकांना मोठा धक्का बसला आहे. मृत मुलीच्या कुटुंबीयांनी आपल्या मुलीच्या मृत्यूसाठी शाळा व्यवस्थापनाला जबाबदार धरले आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर राज्य सरकारने शाळा प्रशासनाकडून संपूरण अहवाल मागवण्यात आला आहे. गुजरातमधील राजकोटमध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे. मृत मुलीचे नाव रिया असे आहे. रिया राजकोटच्या जसानी स्कूलमध्ये इयत्ता आठवीच्या वर्गात शिकत होती. शाळेत वर्ग सुरु असतानाच रिया अचानक बेंचवरुन खाली जमीनीवर पडली. यामुळे वर्गात एकच गोंधळ उडाला. वर्गात शिकवणारे शिक्षक धावत रिया जवळ आले. रियाभोवती विद्यार्थ्यांचा गराडा पडला. रियाला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. रिया नेहमी प्रमाणे सकाळी सात वाजता शाळेत पोहोचली होती. यानंतर 7.30 वाजता प्रार्थना करून आठ वाजता ती वर्गात पोहोचली. वर्ग सुरु असतानाच तिला थंडी भरुन आली. ती अचानक बेशुद्ध झाली आणि ती जमीनीवर कोसळली. थंडीमुळे हृदयविकाराच्या झटक्याने रियाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

COMMENTS