औसा : प्रतिनिधी - ग्रंथासारखा सर्वश्रेष्ठ दुसरा गुरु नाही. प्रत्येक क्षेत्रातील ज्ञान आत्मसात करायचे असेल तर त्यासाठी लागणारे संदर्भ ग्रंथ हेच मू
औसा : प्रतिनिधी – ग्रंथासारखा सर्वश्रेष्ठ दुसरा गुरु नाही. प्रत्येक क्षेत्रातील ज्ञान आत्मसात करायचे असेल तर त्यासाठी लागणारे संदर्भ ग्रंथ हेच मूळ आधार असून ग्रंथ वाचनाने माणसाला बौद्धिक समृद्धी प्राप्त होते, असे प्रतिपादन प्राचार्य सोमनाथ रोडे यांनी केले. औसा येथील मुक्तेश्वर मंगल कार्यालयामध्ये आयोजित लातूर जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघाच्या 38 व्या वार्षिक अधिवेशनामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी अध्यक्ष म्हणून डॉ. ब्रिजमोहन झंवर, डॉ.ॅ गजानन कोठेवार, स्वागत अध्यक्ष सतीशचंद्र बाजपाई, जिल्हा कार्याध्यक्ष हावगीराव बिरखेडे, कोषाध्यक्ष प्रभाकर कापसे, महादेव खिचडे, धनंजय कोपरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
लिखित साहित्याची जागा कोणतेही इलेक्ट्रॉनिक माध्यमे घेऊ शकत नाहीत असे सांगून रोडे पुढे म्हणाले की वाचन संस्कृती ही टिकलीच पाहिजे वाचनामुळे बौद्धिक प्रगल्भता वाढीस लागून माणूस कोणाचाही हस्तक बनणार नाही. वाचणारा माणूस तो विचाराने कुणाचाही हस्तक होऊ शकत नाही माणसाने जमिनीपासून अंतराळापर्यंत केलेली प्रगती याचा मूळ आधार वाचन आहे. त्याशिवाय कोणत्याही क्षेत्रातले संशोधन शक्य नाही असे सांगून कोलकाता येथे झालेल्या बुक फेस्टिवल मध्ये तब्बल 25 कोटी रुपयांची ग्रंथसंपदा विकली गेली हे विसरता येणार नाही. या अधिवेशनामध्ये स्वर्गीय त्रिंबकदास झंवर आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार गजानन कोटेवार वर्धा यांना तर जिल्हास्तरीय स्वर्गीय मारुतीराव चिरके आदर्श ग्रंथपाल पुरस्कार सूर्यकांत जाधव आलमला यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. विकास वाचनालय औसा यांनी या अधिवेशनाचे आयोजन उत्कृष्ट रित्या केले होते. कार्यक्रमासाठी लातूर व बीड जिल्ह्यातील ग्रंथालयाचे संचालक तसेच ग्रंथपाल यांच्यासह ग्रंथालय चळवळीशी निगडित शेकडो ग्रंथालयीन महिला पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभाकर कापसे यांनी केले. सूत्रसंचालन पीसी पाटील यांनी केले.
COMMENTS