Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुक्रमाबाद येथे काँग्रेसचे जेलभरो आंदोलन

मुक्रमाबाद प्रतिनिधी - काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांची खासदारकी केंद्र शासनाने रद्द केली. त्याच्या निषेधार्थ शनिवारी मुक्रमाबाद

उजनी धरणातून कालव्याद्वारे एक आवर्तन सिंचनासाठी देण्यात यावे
चंद्रपूरात पावसाचा हाहाकार
’मविआ’ने त्यांचा मसुदा आम्हाला दाखवावा

मुक्रमाबाद प्रतिनिधी – काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांची खासदारकी केंद्र शासनाने रद्द केली. त्याच्या निषेधार्थ शनिवारी मुक्रमाबाद मुख्यबस्थानकवर भर उन्हात काँग्रेस कमिटीच्यावतीने रास्तारोको आंदोलना व निदर्शने करीत केंद्र सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला.यावेळी बराच वेळ प्रवासी वाहतूक खोळबंली होती.
काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची लोकसभा खासदारकी रद्द करण्यात आल्यामुळे मुक्रमाबाद व सर्कल कॉग्रेसच्या वतीने शहरातील मुख्य बसथानकावर भर उन्हात येथे केंद्र सरकारच्या विरोधात रस्त्यारोको आंदोलन करण्यात आले. हिटलरशाही केंद्र सरकारचा जाहीर निषेध, मोदी सरकार हार हाय, हिटलर शाही नाही चलेगी नाही चलेगी, राहुल गांधी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा देत बस्थानक दनानून सोडले होते.रास्तारोको आंदोलनामुळे प्रवासी वाहतूक  खोळंबली होती. मुक्रमाबाद पोलीसांनी कार्यकर्त्यांना  अटक करुण सोडून दिले.यावेळी कॉग्रेसचे प्रदेश सचिव डॉ.श्रावण रॅपनवाड,चंद्रशेखर गायकवाड, कॉग्रेसचे युवा नेते दिनेश आवडके, संदीप पाटील अतनूरे,अमित गायकवाड, सुनील पाटील, मोशिन कोतवाल, अहेमद खुरेशी.शफी खुरेशी, तानाजी देवकक्ते, चंद्रकांत नाईक, सचिव इंगळे, नारायण मारजवाडीकर, बालाजी पाटील, निळकंठ पाटील, बालाजी कलिटवार, यादू गायकवाड, विठ्ठलराव बनबरे, जयप्रकाश कानगुले, सलिम सय्यद, दत्ता देमगुंडे, रमेश कोळेकर, संदीप देवकक्ते, तुकाराम तोतरे, यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

COMMENTS