Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बालाजी रोहिलावार यांच्या देशी- विदेशी दारूच्या दुकानाची राज्य उत्पादन विभागाकडे तक्रार

नांदेड प्रतिनिधी - देगलूर तालुक्यातील बेंबरा गावच्या लोकांनी बालाजी रोयलावार यांच्या कुटुंबातील देशी-विदेशी दारू दुकानाची तक्रार अधीक्षक राज्य उत

शिंदे सरकारमध्ये कोणी ही नाराज नाही – मंत्री अब्दुल सत्तार 
वारणा नदीच्या पुलावरून खासगी बस कोसळली
एमएचटी-सीईटी परीक्षेतील गुणवंतांचा दयानंद शिक्षण संस्थेतर्फे सत्कार

नांदेड प्रतिनिधी – देगलूर तालुक्यातील बेंबरा गावच्या लोकांनी बालाजी रोयलावार यांच्या कुटुंबातील देशी-विदेशी दारू दुकानाची तक्रार अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क ,नांदेड यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे .या  संदर्भात  बेंबरा गावच्या  दहा ते पंधरा लोकांनी अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग नांदेड यांच्याकडे तक्रार केली असून या तक्रारीत त्यांनी असे म्हटले आहे की, बालाजी गंगाराम रोहिलावार रा. देगलूर यांच्या कुटुंबातील व्यक्तीकडे देसी व विदेशी दारूचे दुकान असून त्यात इतर लोक भागीदार आहेत. हाणेगाव सर्कल मध्ये 25 ते 30 खेडेगाव जोडले असल्यामुळे त्या ठिकाणी शासन मान्य देशी दारू दुकान क्रमांक 253 ला लोकांना विरोध करण्यासाठी बालाजी गंगाराम रोहिलावार यांचा सहभाग आहे. असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.या तक्रारीत पुढे असेही म्हटले आहे की. देगलूर तालुक्यातील   एफ. एल. थ्री आणि सी. एल. थ्री  ही दुकाने नियमबाह्य रीतीने चालविण्यात येतात .या दुकानाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करून सी एल थ्री क्रमांक 253 हे  येथे मंजूर करण्यात यावे.  अशी मागणी नियोजनात केली आहे .तसेच बालाजी रोयलावार शासनाची दिशाभूल करून शासनाचा वेळ वाया घालवीत असल्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी या आशयाचे निवेदन राज्य उत्पादन शुल्क विभाग, नांदेड यांना देण्यात आले आहे. या निवेदनावर बाबुराव कांबळे, मारुती गवळी यांच्यासह 15 ते 20 लोकांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

COMMENTS