Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केंद्र शासनाने साखर निर्यातीचा निर्णय घ्यावा ः आमदार आशुतोष काळे

कोपरगाव प्रतिनिधी ः यावर्षी सर्वच साखर कारखान्यांचे गाळप हंगामाचे अंदाज चुकले असून अपेक्षेपेक्षा कमी गाळप झाले आहे. त्यामुळे काहीशा आर्थिक अडचणी

आमदार आशुतोष काळेंनी भाविकांना केले फराळ वाटप
अपयशातून यशाचा मार्ग तयार करा ः आमदार आशुतोष काळे
डॉ. आंबेडकरांच्या विचारांवर मार्गक्रमण करणे हीच खरी आदरांजली – आमदार आशुतोष काळे

कोपरगाव प्रतिनिधी ः यावर्षी सर्वच साखर कारखान्यांचे गाळप हंगामाचे अंदाज चुकले असून अपेक्षेपेक्षा कमी गाळप झाले आहे. त्यामुळे काहीशा आर्थिक अडचणी निर्माण होणार आहेत. देशांतर्गत साखरेला 3300 रुपये दर मिळत असून आंतरराष्ट्रीय स्तरावर साखरेला जवळपास 4000 रुपये क्विंटल दर मिळत आहे. त्यामुळे शासनाने साखर निर्यातीचा निर्णय घेतल्यास देशांतर्गत साखरेचा दर वाढणार असून शेतकर्‍यांना अपेक्षित दर मिळेल व कारखान्यांच्या देखील आर्थिक अडचणी सुटण्यास मदत होणार आहे. केंद्र शासनाने 5 नोव्हेंबर 2022 रोजी एम.ए.ई.क्यू. अंतर्गत फक्त 60 लाख मे.टन साखर निर्यातीस परवानगी दिली आहे. त्यामुळे या निर्णयात बदल करून निर्यातीमध्ये वाढ करून अतिरिक्त 25 ते 30 लाख मे.टन साखर निर्यातीचा निर्णय तातडीने घ्यावा अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी केली आहे.
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या 2022-23 च्या 68 व्या गळीत हंगामाची सांगता कारखान्याचे मार्गदर्शक व ज्येष्ठ संचालक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीपराव बोरनारे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.अलकाताई  बोरनारे यांच्या शुभहस्ते श्री सत्यनारायण महापूजा करण्यात आली याप्रसंगी आ. आशुतोष काळे बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या आदर्श विचारांवर व आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. 133 दिवस चाललेल्या 2022-23 च्या गळीत हंगामात  5 लाख 24 हजार 948 मे.टन ऊसाचे गाळप होवून 6 लाख 07 हजार 400 क्विंटल साखर पोती उत्पादन झाले असून सरासरी साखर उतारा 11.57 टक्के मिळाला असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले. मागील पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे पिकांना दिलेली खते अतिपावसामुळे वाहून जावून ऊसाच्या मुळांना अपेक्षित असलेले अन्नद्रव्य न मिळाल्यामुळे हेक्टरी 15 ते 20 मे.टन उत्पादन कमी झाल्यामुळे गाळप हंगाम अपेक्षेपेक्षा लवकर बंद झाला. पुढील गाळप हंगामात कारखान्याची गाळप क्षमता वाढणार आहे. गळीत हंगाम अतिशय चांगल्या प्रकारे यशस्वी केल्याबद्दल सर्व सभासद, कर्मचारी, अधिकारी त्याचप्रमाणे गोदावरी खोरे व गौतम केन ट्रान्सपोर्टच्या सर्व ऊस तोडणी कामगारांचे व ट्रक धारकांचे आभार मानले. याप्रसंगी माजी संचालक पद्माकांत कुदळे,एम.टी.रोहमारे,ज्ञानदेव मांजरे,काकासाहेब जावळे, कचरु घुमरे. व्हा.चेअरमन दिलीपराव बोरनारे, संचालक सुधाकर रोहोम, राजेंद्र घुमरे, सचिन चांदगुडे, सूर्यभान कोळपे, श्रीराम राजेभोसले, राहुल रोहमारे, प्रवीण शिंदे, शंकरराव चव्हाण, अनिल कदम तसेच सर्व सलग्न संस्थांचे चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्तविक प्रभारी कार्यकारी संचालक सुनिल कोल्हे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण चंद्रे यांनी केले तर आभार संचालक डॉ.मच्छिंद्र बर्डे यांनी मानले.

COMMENTS