बीड प्रतिनिधी - बीड जिल्ह्यामध्ये रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गत शहरी भागामध्ये 1697 लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले होते.परंतु सदरील लाभार्थ्यांना
बीड प्रतिनिधी – बीड जिल्ह्यामध्ये रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गत शहरी भागामध्ये 1697 लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले होते.परंतु सदरील लाभार्थ्यांना निधी अभावी बांधकाम करता येत नव्हते 2019-2020 मध्ये 232 लाभार्थ्यांना घरकुलाचा निधी मिळालेला नाही या लाभार्थ्यांना 5 कोटी 36 लाख 50 हजार एवढ्या निधीची आवश्यकता भासत होती. तसेच 2021-2022 मध्ये 1465 लाभार्थ्यांना रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले आहे परंतु त्यांना 33 कोटी 87 लाख 81 हजार 250 एवढ्या निधीची आवश्यकता आहे यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अजय सरवदे यांनी थेट सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन प्रधान सचिव सुमंत भांगे यांच्यापुढे बीड जिल्ह्याची व्यथा मांडत त्वरित रमाई घरकुल आवास योजना (शहरी) निधी उपल्बध करून देण्यात यावा अशी मागणी केली होती अन्यथा आजाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता त्यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई यांचे पत्र क्र.28 जा.क्र.698 दि 14.12.2022 रोजी समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांना निधी उपलब्ध करून देणे बाबत कार्यवाही करण्याचे निर्देशित केले होते.
COMMENTS