Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवोदितांच्या कलागुणांना मिळणार वाव !

उपक्रम : राज्यस्तरीय भिम गीत गायन स्पर्धा

बीड प्रतिनिधी - डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाने अवघ्या राज्याला एक आदर्श घालून दिला आहे. त्या अनुषंगाने येत्या शनिवार (दि.8) एप्

ठाकरे गटाला हादरे शिवसेनेसह धनुष्यबाण शिंदे गटाला
प्रवीण दरेकरांवरील कारवाईला वेग
दीपाली सय्यद यांची माजी स्वीय सहायकाविरोधात पोलिसात तक्रार

बीड प्रतिनिधी – डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाने अवघ्या राज्याला एक आदर्श घालून दिला आहे. त्या अनुषंगाने येत्या शनिवार (दि.8) एप्रिल रोजी राज्यस्तरीय भिमगीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सदरील स्पर्धा बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे सकाळी 11 वाजता पार पडणार आहे. या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीने केले आहे. बीडच्या जयभिम महोत्सवात दरवर्षी विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. त्यामुळे राज्यात एक आगळावेगळा महोत्सव म्हणून बीडचा जयभीम महोत्सव अधोरेखित झाला आहे. समाजाला परिवर्तनाकडे नेण्यासाठी सांस्कृतिक मोहीम रुजविणे देखील तेवढेच महत्वाचे आहे. त्या अनुषंगाने यंदाही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्यस्तरीय भिमगीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतून नवोदित गायकांच्या कलागुणांना वाव मिळणार आहे. अधिक माहितीसाठी आणि स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी अरुणाताई आठवले 9421272730, सुमेध जोगदंड 9422332295, संगीताताई वाघमारे 9022686548, यश सवाई 8999109010 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीने केले आहे.

COMMENTS