Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्री कालभैरवनाथांच्या यात्रेनिमित्त बहिरवाडीत पारायण सोहळा

नेवासाफाटा/प्रतिनिधी ः श्री कालभैरवनाथांच्या यात्रेनिमित्त नेवासा तालुक्यातील तीर्थक्षेत्र बहिरवाडी येथे त्रिदिनात्मक पारायण सोहळा व नामयज्ञ सोहळ

शुक्राचार्य महाराज मंदिर गाभार्‍याच्या नूतनीकरणास प्रारंभ
 नुकसानीचे सर्वेक्षण करून शेतकरी बांधवांना भरीव मदत देऊन उभारी द्या ः मा.आ.कोल्हे
साखर उद्योगात फुले 265 वाणाचे समज आणि गैरसमज

नेवासाफाटा/प्रतिनिधी ः श्री कालभैरवनाथांच्या यात्रेनिमित्त नेवासा तालुक्यातील तीर्थक्षेत्र बहिरवाडी येथे त्रिदिनात्मक पारायण सोहळा व नामयज्ञ सोहळयाचे आयोजन सोमवार 3 ते 5 एप्रिल या कालावधीत करण्यात आले आहे. राष्ट्रीय संत देवगडचे महंत गुरुवर्य श्री भास्करगिरी बाबा व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या प्रेरणेने व ग्रामस्थांच्या सहकार्याने हजारो भाविकांच्या उपस्थितीत होणार्‍या त्रिदिनात्मक सोहळयात सकाळी ज्ञानेश्‍वरी पारायण व शिवलिलामृत ग्रंथाचे पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवारी 3 एप्रिल रोजी दुपारी 4 ते 5 यावेळेत हभप दुर्योधन महाराज भोंगळ यांचे प्रवचन तर रात्री 8 ते 10 यावेळेत गोणेगाव चौफुला येथील श्री रामकृष्ण आश्रमाचे महंत वाणीभूषण हभप भगवान महाराज जंगले शास्त्री यांचे कीर्तन, मंगळवारी 4 एप्रिल रोजी दुपारी 4 ते 5 यावेळेत नेवासा बुद्रुक येथील हभप ज्ञानेश्‍वर महाराज पेचे यांचे प्रवचन तर रात्री 8 ते 10 यावेळेत युवा कीर्तनकार हभप लक्ष्मण महाराज नांगरे यांचे हरिकीर्तन होणार आहे. बुधवार 5 एप्रिल रोजी यात्रेच्या मुख्य दिवशी सकाळी 8 वाजता गंगेवरून आणलेल्या कावडीच्या पाण्याने नेवासा येथील श्री मध्यमेश्‍वर मंदिराचे प्रमुख महंत श्री ऋषिनाथजी महाराज व पुनतगाव येथील योगी श्री दीपकनाथजी महाराज यांच्या हस्ते श्री कालभैरवनाथांना जलाभिषेक घालण्यात येईल त्यानंतर सकाळी 9 ते 11 यावेळेत शांतीब्रम्ह गुरुवर्य श्री भास्करगिरी बाबांच्या काल्याच्या कीर्तनाने त्रिदिनात्मक सोहळयाची सांगता होणार आहे. श्री कालभैरवनाथांच्या यात्रेनिमित्त बुधवारी रात्री 9 वाजता पालखी मिरवणूक वाद्यांच्या गजरात निघणार असून गुरुवारी 6 एप्रिल रोजी सकाळी वाद्यवृंदाचा हजेरीचा कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी 3 ते 6 यावेळेत जंगी कुस्त्यांचा कार्यक्रम व शेंबीगोंडाने यात्रा उत्सवाची सांगता होणार आहे. श्री कालभैरवनाथांच्या यात्रेनिमित्त आयोजित त्रिदिनात्मक सोहळयात भाविकांनी प्रवचन कीर्तनासह होणार्‍या इतर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री कालभैरवनाथ पब्लिक स्ट्रस्ट व समस्त बहिरवाडी ग्रामस्थ,श्री कालभैरवनाथ युवा मंच,श्री कालभैरवनाथ तरुण मंडळ, श्री कालभैरवनाथ यात्रा  समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS