Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ.उपाध्ये लिखित ’भारतीय कुंभार समाजातील संत’ दिशादर्शक ग्रन्थ ः ह.भ.प. श्रावण महाराज जाधव

श्रीरामपूर/प्रतिनिधी ः आजचे शिक्षण आणि कालचे शिक्षण यामध्ये मोठे अंतर आहे, ज्ञानशीलसंस्कार आणि श्रमशीलनम्रता देते तेच खरे शिक्षण असून डॉ. बाबुराव

देवळाली प्रवरातील इंग्लिश स्कूलचा निकाल शंभर टक्के
नगरला मिळणार रोज 117 दशलक्ष लिटर पाणी ; अमृत योजनेचे काम अंतिम टप्प्यात
दलित तरुणांचा अमानवीय छळ करणारा मुख्य आरोपी मोकाटच  

श्रीरामपूर/प्रतिनिधी ः आजचे शिक्षण आणि कालचे शिक्षण यामध्ये मोठे अंतर आहे, ज्ञानशीलसंस्कार आणि श्रमशीलनम्रता देते तेच खरे शिक्षण असून डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी प्रतिकूल स्थितीत शिक्षण घेऊन लेखक झाले, त्यांनी लिहिलेला ’भारतीय कुंभार समाजातील संत ’हा ग्रन्थ संसारी व साधकांना दिशादर्शक ठरणारा असल्याचे मत सरला बेटाचे ह.भ.प. श्रावण महाराज जाधव यांनी व्यक्त केले.

 श्रीरामपूरजवळील गोंधवणी येथे कै. नंदकुमार बोर्डे यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमानंतर बाबुराव बोर्डे यांच्या निवासस्थानी सत्कारप्रसंगी ते बोलत होते. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी उपस्थितींना विविध पुस्तके देऊन सत्कार केला. यावेळी ह.भ.प. योगेश महाराज गायकवाड, ह.भ.प.सुनील महाराज वाकचौरे,चिंचवड येथील दिलासा साहित्य ग्रुपचे अशोकराव गोरे,अनिल वाकचौरे,बाबुराव बोर्डेसह परिवार उपस्थित होते. डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी ’भारतीय कुंभार समाजातील संत ’हा भारतीय कुंभार समाजातील संतांचा थोडक्यात आढावा घेणारा दुर्मिळ ग्रन्थ असून दिल्ली येथील विद्यापीठ अनुदान आयोगाच्या प्रकल्प योजनेतील हे संशोधन आहे, अनुदान आयोगाच्या पत्रानुसार हा ग्रन्थ प्रकाशित केला आहे, त्यासाठी कुंभश्री, कुंभकार भारत, कुंभकार दर्शन, तसेच कोल्हापूरचे प्राचार्य डॉ. प्रकाश कुंभार, लातूरचे ’विचारशलाका ’संपादक प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार, लिज्जत पापडचे सुरेश कोते, जामखेडचे विठ्ठलराव राऊत, बेलापूर बदगीचे संजय उकिरडे आदींचे खूप सहकार्य झाले. अशोकराव गोरे यांनी या लेखनाचे कौतुक केले.श्रावण महाराज जाधव यांनी अशी पुस्तके आम्हाला कीर्तन,  प्रवचन, चर्चेसाठी उपयुक्त ठरणारी आहेत, डॉ. उपाध्ये यांच्या साहित्यनिर्मिताचे त्यांनी कौतुक केले. तसेच माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी केलेल्या सत्काराबद्दल धन्यवाद व्यक्त केले.

COMMENTS