Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 सुकेवाडी येथे अनोख्या लग्नाची जोरदार चर्चा; नवरदेव नवरीला बैलगाडीतून गावची सफर

अहमदनगर प्रतिनिधी - आजकाल प्रत्येक जण आपला लग्न सोहळा आगळावेळा साजरा व्हावा यासाठी प्रयत्न करत असतो मात्र असाच एक अनोखा आणि पारंपारिक पद्धतीचा

छोट्या विक्रेत्यांना बंदी, पण दारूवाल्यांची चांदी ; दारूबंदी चळवळीने व्यक्त केली चिंता, दात कोरून पोट न भरण्याचे आवाहन
गणपतींच्या आशीवार्दाने गरजूंची सेवा घडते : महेश निमोणकर
राशीनच्या पालखी उत्सवातून 6 चोरटे ताब्यात

अहमदनगर प्रतिनिधी – आजकाल प्रत्येक जण आपला लग्न सोहळा आगळावेळा साजरा व्हावा यासाठी प्रयत्न करत असतो मात्र असाच एक अनोखा आणि पारंपारिक पद्धतीचा विवाह सोहळा संपन्न झाला आहे.तालुक्यातील सुकेवाडी या ठिकाणी अनेक गोष्टींना छेद देत आपल्या पारंपारिक शैलीत वर वधूची बैलगाडीतून मिरवणूक काढत आगळावेळा संदेश आहे. संपूर्ण गावातून नव वधू-वराची बैलगाडी मधून मिरवणूक काढण्यात आली होती. नवरदेवाने त्याच्या पत्नीला संपूर्ण गावची सफर घडवली..

 संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी येथील सुवर्णा आन्हे व विठ्ठल वाघे  यांचा शुभविवाह सुकेवाडी दत्त मंदिर याठिकाणी पारंपारिक रूढी परंपरा जोपासित संपन्न करण्यात आला.जुनी परंपरा जोपासित बैलगाडीतून वधू आणि वर यांची गावातून मिरवणूक काढली व संद्याकाळी वरातिची कार्यक्रम संपन्न झाला मात्र गावातून वधू-वराची काढण्यात आलेली बैलगाडीतील मिरवणूक मात्र या लग्नाची आकर्षण ठरली आहे. या बैलगाडी मिरवणुकीची जोरदार चर्चा परिसरात रंगल्याचे आपल्यास एकंदरीत दिसून येत आहे.

COMMENTS