धाराशीव/प्रतिनिधी ः राज्यातील ठाकरे सरकार कोसळून तब्बल 9 महिन्याचा कालावधी उलटला असला तरी, ठाकरे सरकार नेमके कसे कोसळले, याविषयी स्पष्ट भूमिका कु
धाराशीव/प्रतिनिधी ः राज्यातील ठाकरे सरकार कोसळून तब्बल 9 महिन्याचा कालावधी उलटला असला तरी, ठाकरे सरकार नेमके कसे कोसळले, याविषयी स्पष्ट भूमिका कुणीच मांडली नसतांना, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मंगळवारी भाजप नेते देवेेंद्र फडणवीस यांच्या आदेशानेच ठाकरे सरकार कोसळले असून, त्यासाठी 150 बैठका घेतल्याचा गौप्यस्फोट केला आहे. सावंत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मंत्री असल्यामुळे या गौप्यस्फोटाला विशेष महत्व प्राप्त झाले असून, याप्रकरणी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांची देखील मोठी कोंडी होण्याची शक्यता आहे.
सरकार पाडण्यासाठी आमची रणनीती आधीपासूनच ठरली होती, त्यामुळे शिवसेनेतील आमदारांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू होते, त्यासोबतच देवेंद्र फडणवीसांसोबतही बोलणे सुरू होते, असा दावा सावंत यांनी केला आहे. धाराशीव जिल्ह्यातील परंडा येथे भैरवनाथ केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेदरम्यान सावंत यांनी ठाकरे सरकार पाडण्यासाठी आपण व्युव्हरचना आखली असल्याचा गौप्यस्फोट केला.
यावेळी बोलतांना आरोग्यमंत्री सावंत म्हणाले की, आपण चांगले काम करुनही आपल्याला मंत्रिमंडळ विस्तारत स्थान मिळाले नाही. तेंव्हाच आपण यापुढे मातोश्रीची पायरीही चढणार नसल्याची शपथ घेतली. उध्दव ठाकरे यांच्या विरोधात जाहीररीत्या पहिली बंडखोरी केली. फडणवीस यांच्या मदतीने धाराशिव जिल्हा परिषदेत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. आणि शिवसेनेतील आमदारांचे मतपरिवर्तन करण्यास सुरुवात केली. राज्याभरात तब्बल 150 बैठका घेतल्या. देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदेंने त्यासाठी मोठी साथ दिली. त्यामुळेच ठाकरे सरकार पाडण्यात आपल्याला यश मिळाले असल्याचा गौप्यस्फोट सावंत यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी 2019 च्या निवडणुकीत जनतेने दिलेला कौल नाकारला. भाजप-शिवसेना युतीला कौल दिलेला असताना शरद पवार यांनी त्यात मिठाचा खडा टाकला. आणि जनमत डावलून पक्षप्रमुख ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबत सत्ता स्थापन केली. त्या सरकारमध्येही आपल्याला स्थान दिले नाही. त्यामुळे मातोश्रीवर जाऊन ‘त्यांना’ सांगून आलो की मी आता पुन्हा या मातोश्रीची पायरी चढणार नाही. 30 डिसेंबरला मंत्रीमंडळ विस्तार झाला. त्यातूनही उद्धव ठाकरे यांनी आपल्याला दूर ठेवले. त्यामुळे संतप्त होऊन आपण देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने 3 जानेवारीला राज्यात पहिली बंडखोरी केली. भाजपच्या साथीने धाराशिव जिल्हा परिषदेत शिवसेना-भाजप युतीची अधिकृत सत्ता स्थापन केली. त्यानंतर सलग दोन वर्षे हे सरकार पाडण्यासाठी कामाला लागलो. देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्यासोबत सतत बैठका झाल्या. जवळपास 100 ते 150 बैठका झाल्या. या काळात विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांच्या भेटी घेतल्या. त्यांना सर्वकाही स्पष्ट सांगून त्यांचे मतपरिवर्तन केले. सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या या गौप्यस्फोटामुळे ठाकरे सरकार पाडण्याचे कटकारस्थान दोन वर्षांपासून शिजत असल्याचे पहिल्यांदाच समोर आले आहे.
फडणवीसांच्या आदेशानेच ठाकरे सरकार कोसळले – आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हणाले की, आम्ही शिवसेनेतील आमदारांचे मन वळवण्यास सुरुवात केली. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी तब्बल 150 बैठका घेतल्या. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा आदेश आला आणि आम्हाला महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात यश आले, मोठा गोप्यस्फोट सावंत यांनी केला आहे.
COMMENTS