Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

साई गाव पालखी सोहळ्यासाठी वाहनांची नोंद करण्याचे आवाहन

कोपरगाव प्रतिनिधी ः सालाबाद प्रमाणे याही वर्षी कोपरगाव शहरातील मुंबादेवी तरुण मंडळाच्या वतीने आयोजित रामनवमी उत्सवानिमित्त साई गाव पालखी सोहळ्यान

जिल्हाचा महसूल विभाग अव्वल…चक्क लाचख़ोरीतही…
टॉप हंड्रेड थकबाकीदारांमध्ये…नगर टॉपवर
कोरोना काळात गरीबांसाठीच्या धान्याचे नगरला होत होते पीठ ; अटक केलेल्या आठ आरोपींना पोलिस कोठडी

कोपरगाव प्रतिनिधी ः सालाबाद प्रमाणे याही वर्षी कोपरगाव शहरातील मुंबादेवी तरुण मंडळाच्या वतीने आयोजित रामनवमी उत्सवानिमित्त साई गाव पालखी सोहळ्यानिमित्त साई भक्तांना परत शिर्डी वरून कोपरगावला येण्यासाठी जास्तीत जास्त वाहन धारकांनी आपल्या वाहनांची नोंद करावी असे आवाहन माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल व मुंबादेवी तरुण मंडळाचे अध्यक्ष राहुल खडांगळे यांच्यावतीने करण्यात आले आहे.
या पालखी सोहळ्याविषयी आयोजकांच्या वतीने अधिक माहिती देताना सांगितले की, कोपरगाव शहरातील प्रसिध्द साईगाव पालखी सोहळा मुंबादेवी तरुण मंडळाच्या वतीने दरवर्षी रामनवमीच्या शुभमुहूर्तावर आयोजित केला जात असतो, याही वर्षी कोपरगाव शहरातील मुंबादेवी मंदिरातून मोठ्या भक्ती भावाने जल्लोषात साईबाबांची पालखी शिर्डी कडे साईबाबांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांच्या संगतीने सकाळी वाजत-गाजत प्रस्थान करणार असून हा सोहळा रामनवमीच्या दिवशी रात्री उशिरा संपल्यानंतर कोपरगाव मधून शिर्डीला पायी गेलेल्या भाविकांना परत कोपरगावला येण्यासाठी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना, संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज, समता नागरी सहकारी पतसंस्था, नामदेवराव परजणे पाटील दूध उत्पादक संघ यांच्यासह परिसरातील अनेक सामाजिक संस्था व दानशूर भाविक भक्त यांच्या वाहनांच्या मदतीने मुंबादेवी तरुण मंडळ अतिशय उत्कृष्टपणे कोपरगावच्या सर्व भाविकांना परत आणण्याचे नियोजन करत असते. गेल्या दोन-तीन वर्षापासून कोरोनामुळे या पालखी सोहळ्यावर काही निर्बंध आलेले होते परंतु यावर्षी हा सोहळा मोठ्या जल्लोषात होणार असल्याने मोठ्या प्रमाणात हजारोच्या संख्येने भाविक भक्त यात सहभागी होणार असल्याने त्यांना परत आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहनांची गरज भासणार असून त्यामुळे परिसरातील दानशूर भाविक भक्तांनी या पालखी सोहळ्यातील भाविकांना परत कोपरगावला येण्यासाठी आपल्याकडे असलेल्या वाहनांची नोंद  करण्यासाठी खालील नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS