Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईतल्या साकीनाका भागात भीषण आग

मुंबई/प्रतिनिधी ःमुंबईत गेल्या काही दिवसांपासून आगीच्या घटनेत मोठया वाढ झाल्या आहेत. साकीनाका भागात रविवारी पहाटे हार्डवेअरच्या दुकानाला आग लागली

‘आनंद सागर’ भाविकांसाठी खुलं होणार
समृद्धीवरील अपघातात पिता-पुत्र गंभीर जखमी
डीजेमुळे मराठमोळ्या सणांची प्रतिष्ठा कमी : आ. सत्यजित तांबे

मुंबई/प्रतिनिधी ःमुंबईत गेल्या काही दिवसांपासून आगीच्या घटनेत मोठया वाढ झाल्या आहेत. साकीनाका भागात रविवारी पहाटे हार्डवेअरच्या दुकानाला आग लागली. या आगीत दुकान जळून खाक झाले. साकीनाका या मेट्रो स्टेशनच्या जवळच्या दुकानाला ही आग लागली. राजश्री असे या दुकानाचे नाव आहे. ही आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी त्या ठिकाणी पोहचले. त्यांनी अथक प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली. त्यानंतर आगीचा पुन्हा भडका उडाला. आत्ताही
अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी उपस्थित आहेत. काही स्थानिकांनी ट्विटरवर या घटनेचे व्हिडीओ पोस्ट केले आहेत. राजश्री या साकीनाका भागातल्या दुकानाला पहाटे तीनच्या दरम्यान आग लागली. यानंतर अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अर्ध्यात तासात त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. आग नियंत्रणात आली आहे असे वाटत असतानाच पहाटे पाच वाजता आगीचा पुन्हा भडका उडाला. ज्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या पुन्हा एकदा घटनास्थळी पोहचल्या. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 8 ते 10 गाड्या आल्या असून फायर कुलिंगचे काम या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र साकीनाका भागात आगीमुळे धुराचे लोळ पसरले आहेत. या आगीमध्ये दोन दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली? याबाबत स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान माहिती घेत आहेत.

COMMENTS