Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांदेडमध्ये बेरोजगारीला कंटाळून तरुणाची आत्महत्या

नांदेड : बेरोजगार तरुणानी आर्थिक विवचनेला कंटाळून अखेर अंगावर डिझेल टाकून पेटून घेऊन आपली जीवन यात्रा संपवल्याची घटना नांदेड जिल्ह्यातील किनवट ता

पत्नीच्या मदतीने नवर्‍याने प्रेयसीला संपवले
गर्दीने भरलेल्या बसमधून शालेय विद्यार्थी पडला रस्त्यावर
पंतप्रधान मोदींचे संविधान वक्तव्य आणि वास्तव!

नांदेड : बेरोजगार तरुणानी आर्थिक विवचनेला कंटाळून अखेर अंगावर डिझेल टाकून पेटून घेऊन आपली जीवन यात्रा संपवल्याची घटना नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील पांगरी तांडा येथे  24 मार्च रोजी रात्री साडेदहाच्या दरम्यान घडली. अंगावर डिझेल टाकून पेटवून घेतलेल्या बेरोजगार तरुणाचे नाव नंदू बाबुराव जाधव आहे.
हा बेरोजगार तरुण खाजगी शैक्षणिक बस चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. मात्र वाढत्या महागाई मध्ये आपल्या संसाराचा गाडा चालवताना आर्थिक विवेचनेत सापडला होता.अखेर अंगावर डिझेल टाकून आपली जीवन यात्रा संपवली. या घटनेत  नंदू जाधव 90 टक्के भाजल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती इस्लापूर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तरुणाचा भाजलेला मृतदेह शवविच्छेदनासाठी इस्लापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी के.पी.गायकवाड व सेवक कृष्णा जाधव यांनी शवविच्छेदन करून  मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. पुढील तपास इस्लापूर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश बोधगिरे हे तपास करीत आहेत.

COMMENTS