Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

त्या कर्मचार्‍यांच्या वारसांना मिळणार 50 लाख रुपये अनुदान

श्रीगोंदा प्रतिनिधी : कोरोना काळात कर्तव्य बजावताना मृत्यू झालेल्या ग्रामविकास विभागातील कर्मचार्‍यांच्या वारसांना 50 लाख रुपये सानुग्रह अनुदान म

रस्त्याच्या मधोमध वाहन उभे करणार्‍या वाहन चालकावर गुन्हा
विविधरंगी गणेशमूर्तींनी सजल्या नेवासा येथील बाजारपेठा
साखर उद्योगाबाबत शाश्‍वत धोरणाची गरज ः आ. आशुतोष काळे

श्रीगोंदा प्रतिनिधी : कोरोना काळात कर्तव्य बजावताना मृत्यू झालेल्या ग्रामविकास विभागातील कर्मचार्‍यांच्या वारसांना 50 लाख रुपये सानुग्रह अनुदान मिळण्याचा मार्ग माजी मंत्री आमदार प्रा.राम शिंदे यांनी अधिवेशन काळात तारांकित प्रश्‍न विचारल्याने मोकळा झाला असून आवश्यक कागद पत्रे पूर्ण होताच वारसांना अनुदान मिळणार असल्याने या पाठपुराव्या बाबत आमदार प्रा.राम शिंदे यांचे वृदधेश्‍वर अर्बन मल्टीस्टेट सोसायटी चेअमन विठ्ठलराव वाडगे पा.यांनी अभिनंदन केले आहे
वाडगे म्हणाले कोरोना काळात मृत्यू झाल्यास 50 लाख रुपये विम्याची तरतूद करण्यात आली होती मात्र या काळात मृत्यू झालेल्या सुमारे 200 कर्मचर्‍यांच्य वारसांना अनुदान अद्याप मिळाले नाही याबाबत नुकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशनात आमदार राम शिंदे यांनी तारांकित प्रश्‍न विचारला असता ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन यांनी सदर प्रश्‍ना बाबत सरकार सकारात्मक असून संभधित अधिकारी कडून माहिती मागवून अनुदान देण्यात येणार असल्याचे सांगितल्याने मृत कर्मचार्‍यांच्या वारसांना आता अनुदान मिळणार आहे.या प्रश्‍नबाबत संघटना देखील अनेक महिन्यापासून पाठपुरावा करत होती. उत्तरात मंत्री ना. गिरीश महाजन यांनी अंदाज पत्रकात निधीची मागणी करण्यात आली असून संबंधित अधिकारी वर्गाकडून आवश्क कागद पत्र पूर्ण होताच अनुदान मिळणार आहे.प्रलंबित प्रश्‍न मांडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याबद्दल वाडगे यांनी अभिनंदन केले आहे तसेच या काळात कर्ता पुरुष गमावल्याने कुटुंबीयांची वाताहत झाली या कर्मचार्‍यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर सेवेत घेण्याचीही मागणी विठ्ठलराव वाडगे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

COMMENTS