Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अबकी बार केसीआर सरकार

नारा बुलंद करण्याचा माजी खासदार हरिभाऊ राठोड यांचा दावा

यवतमाळ प्रतिनिधी - राज्यात शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास मदतीची घोषणा करण्यात येते. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना काही मिळत नाही. पंतप्रधान नरेंद्र

शालेय वह्यांचे वाटप स्तुत्य उपक्रम ः पुष्पाताई काळे
विद्युत भवनात डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना  अभिवादन
खा. शरद पवारांनी बीड आणि परभणीत पीडित कुटुंबीयांची घेतली भेट

यवतमाळ प्रतिनिधी – राज्यात शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास मदतीची घोषणा करण्यात येते. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना काही मिळत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना मोठमोठे आश्वासन दिले होते. त्याचे काही झाले नाही. उलट शेतकरी आत्महत्या वाढल्या. त्या उलट स्थिती तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांची आहे. तेथे शेतकरी आत्महत्या होत नाही. शेतकरी संकटात येण्यापूर्वी मदत केली जाते. त्यामुळे अबकी बार केसीआर सरकार हा नारा बुलंद केल्या जाईल, असा दावा माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केला. यवतमाळ जिल्ह्यात दौऱ्यावर आले असता, त्यांनी लोकशाही न्यूजशी संवाद साधला. 26 मार्च रोजी लोहा येथे मोठी सभा होणार असून, दोन लाख लोकांची उपस्थिती राहील. सभेत केसीआर आपली भूमिका स्पष्ट करतील. पोहरादेवी येथेही तेलंगणा सरकारमधीलमंत्री येणार असल्याची माहिती माजी खासदार राठोड यांनी दिली.

COMMENTS