Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवणार ः राजू शेट्टी

कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीचे सर्वच राजकीय पक्षांना वेध लागले असून, त्यादृष्टीने सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी केली असून, रासपचे नेते महादेन

प्रत्येक युनिटचे पैसे वसुल झाले नाही तर महावितरणचे अस्तित्व धोक्यात : सिंघल
पीएसआय झालेल्या विजया कंठाळेचा आव्हाड महाविद्यालया कडून सत्कार
गौतम गंभीर आणि विराट कोहली मैदानातच भिडले

कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीचे सर्वच राजकीय पक्षांना वेध लागले असून, त्यादृष्टीने सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी केली असून, रासपचे नेते महादेन जानकर यांनी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा नारा दिल्यानंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देखील लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा इशारा दिला आहे. आगामी लोकसभेच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढताना पूर्ण तयारीने उतरणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच तयारीला लागावे, असे सांगत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी प्रचाराचे रणशिंग फुंकले. आंबा (ता. शाहूवाडी) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्वाभिमानी पक्षाच्या अभ्यास शिबीरास सुरुवात झाली आहे.

COMMENTS