Homeताज्या बातम्यासंपादकीय

समझदार सभी जानते है….. बिसलेरी !

मित्रहो, पाणी हे जीवन असतं, हे आपणा सर्वांना घोटून घोटूनच ठाऊक आहे! नुकताच जगातला मानवाधिकाराचा पहिला लढा; जे पाण्यावर सर्व मानव समाजाचा समान हक्

रहबर ते रेडिओ ! 
राहुल गांधी आणि मणिपूर कथा ! 
लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक कधी ?

मित्रहो, पाणी हे जीवन असतं, हे आपणा सर्वांना घोटून घोटूनच ठाऊक आहे! नुकताच जगातला मानवाधिकाराचा पहिला लढा; जे पाण्यावर सर्व मानव समाजाचा समान हक्क आहे, असा मानव अधिकार प्रस्थापित करणारा लढा जो महाडमध्ये १९२७ साली मार्च महिन्यात झाला होता. २० मार्च हा दिवस आता दोन-तीन दिवसांपूर्वीच नुकताच गेला. हे सगळं आठवण्याचं कारण असं की, पाणी हे आजही लोकांना मोफत आणि मुबलक मिळावं हा त्यांचा अधिकार आहे. मात्र, जगातल्या काही लोकांच्या डोक्यात हेच पाणी कालांतराने विकण्याची कल्पना आली. ज्याच्या डोक्यातून ही कल्पना आली त्याला जगाने सर्वात पहिल्यांदा मूर्खात काढला. कारण, मुबलक आणि मोफत आणि सर्वत्र उपलब्ध असणारे पाणी, विक्री करणारा हा निश्चितपणे वेड्यांच्या बाजाराचा म्होरक्या असला पाहिजे. परंतु, आज आपण पाहत आहोत, म्हणजे अगदी झोपडपट्टी वाशियांपासून तर टाॅवरपर्यंतचा भारतीय समाज त्याच्या आजूबाजूला आज मिनरल वाटर शोधत फिरतो.  त्या बॉटल्स प्रवासात, सभा मंचावर, सभेत, मीटिंगमध्ये, अनेक कार्यक्रमांमध्ये, आजारी माणसांसाठी अशा बहुतेक वेळा मिनरल पाण्याच्या बाटल्या वापरल्या जातात. मात्र भारतातल्या सर्वसामान्य माणसाला शुद्ध पाण्याच्या बाटलीला मिनरल वॉटर बॉटल म्हणतात हे ठाऊक नाही. तर त्याला ठाऊक आहे ते फक्त बिसलेरी! भारतामध्ये मिनरल वॉटर चे अनेक ब्रँड आहेत. परंतु, सर्वसामान्य माणसे त्या पाण्याच्या बाटल्यांना आजही बिसलरी पाणी म्हणतात. किंवा बिसलरी बॉटल म्हणतात. याचे कारण भारतामध्ये सर्वात प्रथम मिनरल वॉटरची निर्मिती केली ती बिसलरी या नावाने. आता बिसलरी या नावा मागे फार मोठा उद्योजक म्हणून किंवा गाजलेल्या उद्योजक म्हणून असं नाव नव्हतं. परंतु अलीकडेच ७००० कोटीच्या या कंपनीचा विक्री विषयीचा व्यवहार अनेकांच्या कानावर पडला होता.  या विक्रीमध्ये टाटांच्या नावाचा सहभाग चर्चेला होता. बिसलेरी आणि टाटा यांच्यामध्ये काही काळ बोलण्या सुरू होत्या, असेही चर्चेला होतं. परंतु, अखेर तो व्यवहार होण्यापूर्वीच फिस्कटला आणि बिसलरी ही कंपनी विक्रीपासून राहीली!  रमेश चव्हाण यांच्या मालकीची ही कंपनी त्यांच्या मुलीकडे सोपवली जाईल किंबहुना मुलगी जयंती चव्हाण यांच्याकडे सोपवली जाईल अशी चर्चा होती. परंतु त्याही चर्चेला पूर्णविराम मिळाला. या चर्चेला पूर्णविराम मिळण्याचे कारण की रमेश चव्हाण आणि जयंती चव्हाण या बापलेकी मध्ये काही मतभेद असल्याचे बोलले गेले. त्यामुळे ही कंपनी आता त्या कंपनीच्या सीईओ असणाऱ्या अंजली जॉर्ज यांच्या कडे सुपूर्द करण्यात आली. पाणी तसा सर्वसामान्यांचा हक्क आहे. आणि पाणी विकले जाईल हे कल्पना एकेकाळी करणं म्हणजे महामुर्खांच्या नंदनवनात वावरण्यासारखं होतं. परंतु एखादा कल्पक किंवा दूरदृष्टी असणारा व्यक्ती हा उद्योजक म्हणून तेव्हा जन्माला येतो जेव्हा, त्याच्या डोक्यामध्ये नव्या कल्पना जन्म घेतात. भारतीय समाजाचं वास्तव असं आहे की, एखाद्या क्षेत्रातलं प्रोडक्शन किंवा प्रॉडक्ट जेव्हा येतं तेव्हा तो त्याच प्रॉडक्टच्या नावाशी बांधील होऊन जातो. त्यानंतरची येणारी कितीही प्रॉडक्ट असो तो त्या प्रॉडक्ट ना सर्वात प्रथम आलेल्या प्रॉडक्ट च्या नावाविषयीच संबोधत असतो. टूथपेस्टच उदाहरण जरी आपण पाहिलं तरी आपल्याला हेच दिसेल की भारतीय जनमानसाच्या मनावर कोलगेट या नावाचा फार मोठा पगडा आहे.  घरून तो कोणतीही टूथपेस्ट घ्यायला जात असेल तर टूथपेस्ट सांगण्याऐवजी तो आजही दुकानावर आणि खासकरून ग्रामीण भागात हे चित्र तर आजही दिसतं तो दुकानावर जाऊन कोलगेटच मागत असतो. आणि मग दुकानदार त्याला त्याच्या दुकानात जो ब्रँड असेल तो देईल त्या ब्रँड विषयी त्याचे काही मतभेद नसतात. त्याला एवढेच पाहिजे असते की दात घासण्यासाठी एक प्रोडक्शन त्याला हवं असतं आणि ते तो कोलगेट च्या नावाने ते मागत असतो. तर अशा ह्या कहाण्या या एकूणच उद्योग क्षेत्राच्या वेगळेपण आपल्यासमोर ठेवतात परंतु बिसलेरीच्या अनुषंगाने जो हस्तांतरचा किंवा अधिकारांच्या हस्तांतराचा किंवा विक्रीचा जो व्यवहार होऊ पाहत होता त्या व्यवहारांमध्ये अनेक गोष्टी असतीलही परंतु एक मात्र निश्चितपणे लक्षात असायला हवे की, सत्ता आणि संपत्ती याला वारसदार नव्हे तर हक्कदारच असतात!  असं म्हणतात की सत्ता आणि संपत्तीला वारसदार नाही तर केवळ हक्कदार असतात, हीच वस्तुस्थिती आजच्या या बिसलेरीच्या निमित्ताने दिसली.

COMMENTS