Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केंद्रीय मंत्री गडकरींना पुन्हा धमकीचा फोन

मागितली 10 कोटींची खंडणी दोन महिन्यात दुसर्‍यांदा धमकी

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी धमकी आली असून, या धमकी देणार्‍याने तब्बल 10 कोटी रुपयांची खंडणी

महाराष्ट्रातच इन्कम आणि टॅक्स आहे काय?; संजय राऊतांचा भाजपला सवाल | LOKNews24
‘रिक्षामधील आरसे काढून टाका’, महिलांची मुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी
तापमानवाढ चिंताजनक  

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी धमकी आली असून, या धमकी देणार्‍याने तब्बल 10 कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे. हा दूरध्वनी त्यांच्या नागपूरमधील कार्यालयात हे कॉल आल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील कार्यालयात हे धमकीचे कॉल आहे. मंगळवारी सकाळी दोन वेळा कार्यालयातील लँडलाईन क्रमांकावर हे कॉल आले.या कॉलवरून गडकरींकडे 10 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली अशी माहिती आहे. नितीन गडकरी यांच्या कार्यालयाने नागपूर पोलीसांना याबाबात माहिती दिली आहे. यानंतर पोलिसांनी गडकरींच्या सुरक्षेत वाढ केली आहे.
दोन महिन्यात दुसर्‍यांदा गडकरींच्या कार्यालयात धमकीचा फोन आल्यामुळे सुरक्षेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. काल मंगळवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास धमकीचा पहिला कॉल आला. कार्यालयातील कर्मचार्‍यांनी या घटनेनंतर तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी जनसंपर्क कार्यालय गाठत माहिती घेतली. एटीएसच्या पथकानेही कार्यालयाला भेट देऊन माहिती घेतली. मंगळवारी सकाळी दोनदा गडकरी यांच्या ऑरेंज सिटी रुग्णालयाच्या समोरील जनसंपर्क कार्यालयात धमकीचे कॉल आले. धक्कादायक म्हणजे पुन्हा एकदा जयेश पुजारी उर्फ जयेश कांथा या गुन्हेगाराच्या नावाने धमकीचे कॉल आले आहेत.

COMMENTS