Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दौंडमध्ये तरुणांचे बळजबरी धर्मांतर ः आमदार नीतेश राणेंचा आरोप

मुंबई ः समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी राज्यात लव्ह जिहाद आणि धर्मांतराच्या मुद्द्यावरून केलेल्या वक्तव्यावर भाजप आमदार नीतेश राणे यांच्या

त्रिवेणीश्‍वर येथे श्रीराम कथा सोहळयास भाविकांची मांदियाळी
सिद्धार्थ किसन चव्हाण यांची वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयात पेटंट ऑफिसर म्हणून निवड
पुणे जिल्हा परिषद : एकूण गटांपैकी १४ गट हे मागासवर्गीयांसाठी आरक्षित

मुंबई ः समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी राज्यात लव्ह जिहाद आणि धर्मांतराच्या मुद्द्यावरून केलेल्या वक्तव्यावर भाजप आमदार नीतेश राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. या प्रकरणी बोलताना त्यांनी दौंडच्या घटनेचा व्हिडिओ लावत मग हे काय असा सवाल उपस्थित केला. तर श्रीरामपुरातील घटनेचा उल्लेख करत त्यांच्या भूमिकेला जितेंद्र आव्हाड आणि अबू आझमी यांचे समर्थन आहे, का असा सवाल उपस्थित केला.
दौंडमध्ये कुमल कुरेशी नावाच्या एका मुस्लीम व्यक्तीने हिंदू तरुणाचा जबरदस्तीने सुंता करून त्यांचे धर्मांतर केले. ही घटना 14 ऑक्टोबर 2022 रोजी घडल्याचा आरोप भाजप आमदार नीतेश राणे यांनी करत यांचा व्हिडिओ पत्रकार परिषदेत केला. दौंडमधील धर्मांतर प्रकरणाचा व्हिडिओ नीतेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दाखवला. त्या व्हिडिओमध्ये कुमल कुरेशी या व्यक्तीच्या पत्नीने काही धक्कादायक खुलासे केलेत. त्यात ती म्हणते की, माझे पती कुमल कुरेशी यांनी अनेकांची धर्मांतर केले. हा व्हिडिओ अबू आझमी आणि जितेंद्र आव्हाड यांना दाखवण्याची गरजही यावेळी राणे यांनी व्यक्त केली. जर मुस्लीम तरुणांना हिंदू मुलीशी लग्न करायचे असेल, तर त्यांनी तिला हिंदू राहू देत केले पाहिजे. तुम्ही तिचा धर्म बदलायला लावता हे चुकीचे आहे. हा लव्ह जिहाद होत नाही हे, जितेंद्र आव्हाड आणि अबू आझमी जे म्हणतायत त्यांनी हा व्हिडिओ पाहायला पाहिजे. हे पुरावे आम्ही कोर्टात दाखल केल्याचेही त्यांनी सांगितले. आमदार नीतेश राणे म्हणाले की, ज्या तरुणांचे धर्मांतर केले त्यांचे कुटुंबीय घाबरून दौंड सोडून पळून गेले. धर्मांतरांच्या 1 लाख केस आहेत. हा व्हिडिओ बघितल्यानंतर असे दिसते की हिंदू तरुणांना धमकी देतात. त्यांच्या कुटुंबियांना दहशतीत ठेवतात म्हणून पुढे केस दाखल करता येत नाही. श्रीरामपुरात एका विवाहित हिंदू महिलेला आपल्या जाळ्यात ओढले. तिचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिच्या 14 वर्षीय मुलीचे बळजबरीने लग्न लावून तिला धर्मांतर करण्यासाठी दबाव आणला गेला. ती 7 महिन्यांची गर्भवती आहे. हा लव्ह जिहाद नाही का?, असा सवाल त्यांनी केला. आमदार नीतेश राणे म्हणाले की, गृहखात्यातील काही पोलिस अधिकारी आजही असे आहेत, जे ’मविआ’च्या प्रेमात आहेत. ते हिंदुत्ववादी तरुणांना मदत करत नाहीत. राज्यात हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आहे. कुणीजर जर हिंदुत्ववादी तरुणांना मदत केली नाही, तर त्या अधिकार्‍यांना आम्ही जास्त काळ त्या खुर्चींवर ठेवणार नाही. आम्ही राज्यातील प्रत्येक केसवर लक्ष ठेवून आहोत. जितेंद्र आव्हाड आणि अबू आझमींनी काही केले तरी आम्ही हिंदूत्ववादी तरुण आणि तरुणींच्यासोबत आहोत. नीतेश राणे म्हणाले की, कुमल कुरेशी सारख्या लोकांना तुम्ही एक प्रकारे या जिहादी लोकांना मदत करत आहात, असा टोला त्यांनी जितेंद्र आव्हाड आणि अबू आझमींना लगावला. या विरोधात कडक कायदा राज्यात आणणार आहोत, असे सांगताना त्यांनी लव्ह जिहाद आणि धर्मांतर या मुद्द्यावरून विरोधकांवर जोरदार टीका केली.

COMMENTS