Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सप्तशृंगी गडावरील कर्मचारीही संपाच्या तयारीत

यात्राकाळात होऊ शकते तारांबळ

नाशिक प्रतिनिधी - साडेतीन शक्तिपीठांपैकी आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंग गडावर वर्षभरात लाखो भाविक हे आई सप्तशृंगीच्या चरणी नतमस्तक ह

मुंबईतल्या साकीनाका भागात भीषण आग
गौण खनिज उत्खनन करणा-या वाहनांवर जीपीएस बंधनकारक
इंडिगो एअरलाईन्सच्या विमानात प्रवाशाचा मृत्यू

नाशिक प्रतिनिधी – साडेतीन शक्तिपीठांपैकी आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंग गडावर वर्षभरात लाखो भाविक हे आई सप्तशृंगीच्या चरणी नतमस्तक होत असतात व नवरात्र आणि चैत्रोत्सवा दरम्यान विविध राज्य व महाराष्ट्रातील धार्मिक भाविक हे जास्तीत जास्त संख्येने सप्तशृंगी गडावरती यात्रेदरम्यान येत असतात. यातच सप्तशृंग देवी ट्रस्टचे अनेक पदाधिकारी व कर्मचारी यात्रेकरिता व वर्षभरात मोठे श्रम घेत असतात. यातच नाशिक वर्कर्स यांच्याकडून आणि चैत्रोत्सवाच्या दरम्यान शुक्रवारी (दि.२४) संपाचा इशारा देण्यात आला आहे. कर्मचार्‍यांच्या विविध मागण्या या वर्षानुवर्ष मान्य होत नसल्याने व त्यावर कुठल्याही प्रकारचा निर्णय होत नसल्याने संपावर जाणार अशी माहिती नाशिक वर्कर्स यांच्या पत्रामार्फत देण्यात आली.

संपाची कारणे
  • आपल्या अस्थापनातील / देवस्थानातील सर्व कामगार-कर्मचारी यांना सातवा वेतन आयोग मागील फरकासह त्वरित लागु करा.
  • आपल्या अस्थापनातील / देवस्थानातील सर्व कामगार-कर्मचारी यांची वेतनश्रेणी शासकिय अधिकारी यांचे मार्फत पडताळणी करणे.
  • आपल्या अस्थापनात /देवस्थानात कामगार-कर्मचारी यांच्या वारसांना अनुकंप धरतीवर नोकरीत सामावून घेणे.
  • आपल्या अस्थापनातील / देवस्थानातील कामगार-कर्मचारी यांना पर्यवेक्षक, लिपीक, सेवेकरी असे काम वर्षानुवर्षे करून घेतले जाते आणि पगार मात्र सेवकाचा दिला जातो. तरी काम व जबाबदारीनुसार वेतन द्यावे.
  • आपल्या अस्थापनात / देवस्थानात नवीन भरती न करता नविन कामगार-कर्मचारी यांना ट्रेनिंग देवून त्या जागेवर नियुक्त करा.
  • आपल्या अस्थापनात देवस्थानात काम करत असलेल्या दोन महीला कामगारांना अदयाप वाळांतपणाच्या रजेचे वेतन अदा केलेले नाही. ते त्वरीत अदा करा.
  • आपल्या अस्थापनातील / देवस्थानातील सुरक्षा रक्षक महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक अधिनियमानुसार किमान वेतन लागू करा.

COMMENTS