Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पेन्शनसाठी सेवानिवृत्ती एसटी कर्मचारी यांचा चोपड्यात मोर्चा

सरकारच्या विरोधात दिल्या घोषणा

जळगाव प्रतिनिधी - जुनी पेन्शन लागू व्हावी यासाठी राज्यभर शासकीय निम शासकीय कर्मचारी 14 मार्चपासून बेमुदत संपावर गेले आहेत आणि आज चोपड्यात आयटक

शेवगावच्या बनावट सोने प्रकरणी 160 जणांना नोटिसा ;गोल्ड व्हॅल्युअर व कर्जदारांचा समावेश, म्हणणे मांडण्याचे पोलिसांचे आदेश
पराभव झाला तरी खचून जावू नका ः डॉॅ. सुजय विखे
बंद गाळ्यात मानवी अवयव सापडल्याने खळबळ | LOKNews24

जळगाव प्रतिनिधी – जुनी पेन्शन लागू व्हावी यासाठी राज्यभर शासकीय निम शासकीय कर्मचारी 14 मार्चपासून बेमुदत संपावर गेले आहेत आणि आज चोपड्यात आयटकच्या नेतृत्वाखाली एसटी महामंडळातील सेवानिवृत्त कर्मचारी व अंगणवाडी आणि मदतनीस यांनी तहसील कार्यालयावर साडेसात हजार रुपये पेन्शन मिळावी व आरोग्य क्लेम लागू व्हावा, या मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गाने मेनरोडने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आले. या मोर्चेकरांनी तहसीलदारांना गेल्या अनेक वर्षापासून एसटी परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त झाल्यानंतर तुटपुंजी पेन्शन मिळत आहे. त्या पेन्शनवर नवरा बायकोचं देखील उदरनिर्वाह होत नाही. तर शासनाने कमीत कमी साडेसात हजार रुपये पेन्शन व आरोग्य सुविधा द्याव्यात. तसेच, अंगणवाडी सेविका व मदतनीस हे देखील बऱ्याच वर्षापासून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना अजून पर्यंत एक रक्कम पेन्शन मिळालेली नाही आहे ते देखील आता वयोमानानुसार विविध व्याधी निर्माण झालेल्या आहेत. तरी एक रकमी रक्कम मिळावी  त्याचबरोबर आरोग्य सुविधा मिळावी, अशी मागणी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी तहसीलदार अनिल गावित यांच्याकडे केली आहे. या मोर्चामध्ये आयटकचे अमृत महाजन गजानन पोद्दार, आनंदराज रायसिंग, देवा पारधी, श्रीनेर पगारे यांच्यासह मोठ्या संख्येत सेवानिवृत्त कर्मचारी मोर्चामध्ये सहभागी झाले होते. 

COMMENTS