Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छत्रपती संभाजीराजे स्थापित स्वराज्य पक्षाच्या नवीन नाशिक व सातपूर विभागाची जम्बो कार्यकारणी जाहीर. 

सध्याच्या घडीच्या राजकीय पक्षांच्या राजकारणाला कंटाळून हजारो युवकांचा स्वराज्य पक्षात प्रवेश - करण गायकर

नाशिक प्रतिनिधी -  नवीन नाशिक येथील क्रॉम्प्टन हॉल या ठिकाणी स्वराज्य पक्षाचा भव्य कार्यकर्ता प्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अ

अखेर मुख्यमंत्री शिंदेंची शिष्टाई यशस्वी
इर्शाळवाडीत आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू
चंद्रपूर नगरीतून महाराष्ट्राच्या राज्यगीताचा शुभारंभ

नाशिक प्रतिनिधी –  नवीन नाशिक येथील क्रॉम्प्टन हॉल या ठिकाणी स्वराज्य पक्षाचा भव्य कार्यकर्ता प्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वराज्यचे प्रदेश संपर्कप्रमुख करण गायकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष केशव गोसावी, उत्तर महाराष्ट्र सचिव शिवाजी मोरे,राज्य कार्यकारणी सदस्य विजय वाहुळे,नवनाथ शिंदे हे उपस्थित होते.

 गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्हाध्यक्षांची निवड स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजी राजे यांनी केल्यानंतर पुन्हा एकदा नाशिक शहरामध्ये स्वराज्य संघटनेत अनेक तरुणांचे प्रवेश घेऊन त्यांना स्वराज्याच्या नवीन जबाबदाऱ्या देण्याचे उद्दिष्ट नाशिक जिल्हाप्रमुख आशिष हिरे यांनी आजच्या या मेळाव्याचे नियोजन व आयोजन केले होते. त्यामध्ये शेतकरी, डॉक्टर, पदवीधर, युवक, युवती, महिला, पुरुषवर्ग, यांना नियुक्ती देण्यात आली.

नवीन नाशिक,सातपूर या भागातून अनेक तरुण,महिला,पुरुषांनी स्वराज्य संघटनेत येण्याचा निर्णय घेतला या सर्व तरुणांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीला कंटाळून छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याला पुन्हा सुराज्य करण्यासाठी आपली काहीतरी नैतिक जबाबदारी आहे या अनुषंगाने प्रेरित होऊन स्वराज्य पक्षात येण्याचा निर्णय घेतला.

या झालेल्या प्रवेश सोहळ्यामध्ये अनेक भागातील तरुणांना व महिलांना अनेक संघटनेच्या विविध आघाड्यां वरील पदावर नियुक्ती देत समाज उपयोगी जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या.

यावेळी स्वराज्य प्रदेश संपर्कप्रमुख करण गायकर यांनी उपस्थित सर्व स्वराज्याच्या मावळ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, इतर पक्ष किंवा संघटनेत काम करत असताना आपण ते कशाही पद्धतीने करत असतो परंतु स्वराज्यात काम करताना एक शिस्त,प्रोटोकॉल या गोष्टी महत्त्वाच्या आहेत कारण आपण ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो आहे ते छत्रपती शिवरायांचे तेरावे वंशज स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजी राजे हे अत्यंत संयमी,पारदर्शी व दुढनिश्चयी तसेच प्रसंगी आक्रमक असलेले नेतृत्व आपल्याला लाभलेले आहे आणि म्हणून स्वराज्यात काम करताना आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करून स्वराज्याच्या भूमिकेला कुठेही बाधा पोहोचेल, आपल्यामुळे कुठेतरी चुकीचे गालबोट लागेल याची आपण सर्वांनी काळजी व दखल घेतली पाहिजे. तुम्ही सर्व आज स्वराज्यात सामील झाला इथून पुढे तुमची प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी स्वराज वाढविण्याचे असेल त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी आजपासून कामाला लागायचे आहे व येणाऱ्या 2024 मध्ये स्वराज्य मोठ्या ताकदीने राजकीय पर्याय म्हणून या महाराष्ट्रात पुढे येणार असून त्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे की आपण स्वराज्याला घराघरापर्यंत पोचविले पाहिजे. गाव तिथे शाखा घर तिथे स्वराज्य या अभियानांतर्गत आपण सगळ्यांनी एकत्र येवून स्वराज्य वाढविण्यासाठी कटिबद्ध राहिले पाहिजे. यावेळी स्वराज्य पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष केशव गोसावी, शिवाजी मोरे, विजय वाहुळे, नवनाथ शिंदे, जिल्हाप्रमुख प्रा उमेश शिंदे, जिल्हाप्रमुख आशिष हिरे यांनी देखील उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून युवक जिल्हाप्रमुख नितीन दातीर, महानगरप्रमुख पुंडलिक बोडके, विद्यार्थी आघाडी महानगरप्रमुख सागर पवार, महिला आघाडी महानगर प्रमुख मनोरमाताई पाटील, सुभाष गायकर, नितीन पाटील, गिरीश आहेर, भारत पिंगळे, योगेश गांगुर्डे, अर्जुन शिरसाट आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हाप्रमुख आशिष हिरे यांनी केले तर सूत्रसंचालन योगेश गांगुर्डे यांनी केले

COMMENTS