नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची 110 उमेदवारांची पहिली यादी सोमवारी 20 मार्च रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्यात काँग्रे
नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची 110 उमेदवारांची पहिली यादी सोमवारी 20 मार्च रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्यात काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. नवी दिल्ली येथे 17 मार्च रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी हे उपस्थित होते.
कर्नाटकमध्ये होणार्या आगामी विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार आहे.यासंदर्भात पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची 17 मार्च रोजी बैठक दिल्ली येथे झाली. त्यावेळी या निवडणुकांत कोणाशीही युती न करण्याचा निर्णय गेण्यात आला. काँग्रेस आपल्या 110 उमेदवारांची पहिली यादी सोमवारी जाहीर करण्याची शक्यता आहे. सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (एसडीपीआय) तसेच अन्य कोणत्याही पक्षासोबत काँग्रेस युती करणार नसल्याचे कर्नाटकचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी म्हटले आहे. कर्नाटक विधानसभेत 224 सदस्य आहेत. काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी सोमवारी जाहीर करणार आहे. विद्यमान आमदारांपैकी चार पाच जणांचा अपवाद वगळता अन्य आमदारांना पुन्हा तिकीट दिले जाणार आहे. कर्नाटकमधील सध्याच्या विधानसभेची मुदत येत्या मे महिन्यात संपत असून, त्यापूर्वी विधानसभा निवडणुका होणे आवश्यक आहे. या निवडणुकांत काँग्रेस उमेदवारी देताना युवक व महिलांना प्राधान्य देणार आहे. कर्नाटकमध्ये विधानसभेच्या 150 जागा जिंकण्याचे लक्ष्य काँग्रेसने ठेवले आहे.
COMMENTS