Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ख्रिस्ती युवकांचा रोजगारांचा प्रश्‍न सोडवू ः दीपकदादा साठे

नेवासाफाटा/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा सरचिटणीस दीपकदादा साठे यांनी पास्टर फेलोशिपच्या पदाधिकार्‍यांशी सुसंवाद चर्चा केली. यावेळी त्य

पाणीपट्टी व करवाढी विरोधात काँग्रेसचे आंदोलन
’इरसाल नमुने’ विनोदी पुस्तक वाचकप्रिय होईल ः डॉ. सुधीर तांबे
राज्यावरील सर्व संकटे दूर होऊ दे ! :आमदार थोरात यांचे श्री गणेशाला साकडे

नेवासाफाटा/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा सरचिटणीस दीपकदादा साठे यांनी पास्टर फेलोशिपच्या पदाधिकार्‍यांशी सुसंवाद चर्चा केली. यावेळी त्यांच्या कार्याचा गौरव नेवासा तालुका पास्टर फेलोशिपच्या वतीने करण्यात आला. ख्रिस्ती युवकांच्या नोकरी व रोजगारीच्या संदर्भात शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी बोलतांना दिली. श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे दीपकदादा साठे यांच्या पुढाकाराने टेनिस बॉल स्पर्धा सुरू असून नेवासा व श्रीरामपूर तालुक्यातील पास्टर बांधवांनी त्यांची भेट घेऊन ख्रिस्ती युवक त्यांच्या रोजगाराच्या व नोकरी संदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी ख्रिस्ती समाजातील युवकांना रोजगार कसा उपलब्ध करता येईल याबाबत साधक बाधक चर्चा बैठकीत करण्यात आली.
    यावेळी बोलतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस दीपकदादा साठे म्हणाले की राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा व आमचे मार्गदर्शक शरदचंद्रजी  पवार साहेब यांच्याशी याबाबत चर्चा करून राज्यातील ख्रिस्ती युवकांना नोकरी व इतर व्यवसायाच्या माध्यमातून त्यांना रोजगार कसा उपलब्ध करता याबाबत मी स्व:त लक्ष घालून पाठपुरावा करणार अशी ग्वाही यावेळी बोलतांना दिली. प्रभु येशुच्या कृपेने लवकरच तरुणांच्या रोजगाराचा व नोकरीचा प्रश्‍न सोडवण्यासाठी मला नक्कीच यश मिळेल यासाठी समाज बांधवांच्या उत्कर्षासाठी तळमळीने काम करणार असा विश्‍वास यावेळी बोलतांना व्यक्त केला. यावेळी झालेल्या बैठकीच्या प्रसंगी श्रीरामपूर तालुक्यातील पास्टर सचिन चक्रनारायण, पास्टर विल्सन बोर्डे, पास्टर बंटी सातदिवे, पास्टर समीर आल्हाट, नेवासा तालुका पास्टर फेलोशिपचे अध्यक्ष प्रकाश चक्रनारायण, उपाध्यक्ष पास्टर किशोर बोरगे, पास्टर नितीन चक्रनारायण, पास्टर सुभाष मैराळ, लहूभाऊ खंडागळे, ब्रदर योगेश बोरगे, संकेत भालेराव यांच्यासह ख्रिस्ती युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी हरेगाव येथे स्वतःच्या खर्चातून युवकांसाठी भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल दीपकदादा साठे यांचा यावेळी पास्टर बांधवांच्या वतीने सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. नेवासा तालुका पास्टर फेलोशिपचे अध्यक्ष पास्टर प्रकाश चक्रनारायण यांनी आभार मानले.

COMMENTS