Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गांजा व अफूच्या शेतीवर छापा… 15 लाखाची झाडे जप्त

नेवासे तालुक्यातील शहापूर व देवगांव शिवारामध्ये पोलिसांची कारवाई

अहमदनगर/प्रतिनिधी ः नेवासे तालुक्यातील शहापूर व देवगाव शिवारामध्ये बेकायदेशीर गांजा व अफूच्या शेतीवर छापा टाकून 14 लाख 95 हजार 420 रुपये किमतीची

नगरमधील नव्या पत्रकारांना घरांसाठी जागा द्या ; डॉ. सोनवणेंची आ. जगतापांकडे मागणी
शाळेची खोली पडलेली असते, पण गावातील मंदिर मोठे असते : मंत्री थोरात यांची खंत
युवकांनी लोकशाही बळकट व समृद्ध करावी : तहसीलदार नानासाहेब आगळे

अहमदनगर/प्रतिनिधी ः नेवासे तालुक्यातील शहापूर व देवगाव शिवारामध्ये बेकायदेशीर गांजा व अफूच्या शेतीवर छापा टाकून 14 लाख 95 हजार 420 रुपये किमतीची 624 लहान-मोठी गांजा व अफूची झाडे नगरच्या स्थानिक गुन्हे शाखने जप्त केली. या प्रकरणी बाबुराव लक्ष्मण साळवे व रावसाहेब भागुजी गिलबिले (वय 38, रा. देवगांव, ता. नेवासा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना नेवासा तालुक्यातील शहापूर शिवारामध्ये बाबुराव साळवे व देवगाव शिवारामध्ये रावसाहेब गिलबिले यांनी त्यांच्या शेतामध्ये बेकायदेशीररित्या गांजा व अफू झाडांची लागवड केल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी पथकातील सहायक पोलिस निरीक्षक गणेश वारुळे, सहायक फौजदार विष्णु घोडेचोर, हेड कॉन्स्टेबल मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पोलिस नाईक शंकर चौधरी, संदीप दरदंले, कॉन्स्टेबल शिवाजी ढाकणे, महिला पोलिस नाईक भाग्यश्री भिटे, महिला पोलिस कॉन्स्टेबल ज्योती शिंदे व चालक हेड़ कॉन्स्टेबल बबन बेरड यांना कारवाईचे आदेश दिले होते. या पथकाने शहापूर येथील बाबुराव लक्ष्मण साळवे यांच्या शेतात पाहणी केली असता गव्हाचे शेतामध्ये 2.5 फुट उंचीची दोन व घरासमोर 8 फुट उंचीचे एक गांजाचे झाड तसेच घरासमोर पोत्यावर गांजाच्या झाडाचा पाला काढून तो वाळवण्यासाठी ठेवल्याचे दिसले. साळवे याच्या शेतामधून 1 लाख 11 हजार 420 रुपये किमतीची तीन गांजाची झाडे जप्त करण्यात आली. त्यानंतर देवगाव येथील रावसाहेब भागुजी गिलगिले याच्या शेतात 13 लाख 84 हजार रुपये 69.500 किलो ग्रॅम वजनाची लहान-मोठी 621 अफूची झाडे व बोंडे कारवाई करुन जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी संदीप दरदंले यांनी नेवासा पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS