Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रभाग 11 मधील पाणी पुरवठा सुरळीत करावा अन्यथा मनपात ठिय्या आंदोलन – अविनाश घुले

नगर - प्रभाग 11 मधील विस्कळीत पाणी पुरवठा तातडीने सुरळीत करावा, अन्यथा मनपात ठिय्या आंदोलन करण्यात येईल, अशा इशार्‍याचे  निवेदन नगरसेवक अविनाश

स्वतंत्र ट्रान्सफार्मरसाठी राजूरी येथे रस्ता रोको
पतसंस्था उन्नतीकडे नेण्यासाठी जबाबदारी ही महत्वाची ः हभप उध्दवजी महाराज
अबब…! दोन महिन्यात पुल खचला

नगर – प्रभाग 11 मधील विस्कळीत पाणी पुरवठा तातडीने सुरळीत करावा, अन्यथा मनपात ठिय्या आंदोलन करण्यात येईल, अशा इशार्‍याचे  निवेदन नगरसेवक अविनाश घुले यांनी मनपा आयुक्त डॉ.पंकज जावळे यांना दिले. निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्र.11 मधील कानडे मळा परिसर, चौधरीनगर, चैतन्य कॉलनी, पुनममोती परिसर, कोठी परिसर, झेंडीगेट परिसर, काळू बागवान गल्ली, ख्रिस्त गल्ली, निळकंठ कॉलनी, आशिर्वाद कॉलनी, अरिहंत कॉलनी, हातमपुरा, गंजबाजार, सराफ बाजार परिसर या भागामध्ये गेल्या एक ते दीड महिन्यांपासून पाणी पुरवठा अत्यंत विस्कळीत झालेला आहे. पाणी पुरवठा वेळेवर होत नाही. केव्हाही पाणी सोडण्यात येते तसेच पाणी पुरवठा अत्यंत कमी दाबाने होत आहे. त्यामुळे बर्‍याच नागरिकांना पाणी मिळत नाही. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून या भागातील नागरिकांना पाण्याकरिता वनवन फिरण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

     या प्रश्नाबाबत मी समक्ष वेळोवेळी पाणी पुरवठा विभागप्रमुख व पाणी पुरवठा इंजिनिअर यांची भेट घेवून या भागातील पाणी पुरवठ्याबाबतच्या समस्या सांगितल्या आहेत. परंतु अद्यापपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत झालेला नाही. तरी सात दिवसांमध्ये वरील भागामध्ये पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास प्रभागातील नागरिकांसमवेत आयुक्तांच्या दालनामध्ये तीव्र स्वरुपाचे ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असेही निवेदनात म्हटले आहे.

     यावेळी अविनाश घुले म्हणाले, धरणामध्ये मुबलक पाणीसाठा असूनही प्रशासनाच्या ढीसाळ नियोजनामुळे नागरिकांना हक्काच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. प्रत्येक भागात पाण्याची बोंब आहे. याबाबत आयुक्तांनी स्वत: लक्ष देऊन नगर शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करावा अन्यथा नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागेल, असेही घुले यांनी म्हटले आहे.

COMMENTS