Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रात्री प्रवाशांना लुटणार्‍या दोघांना पोलिसांनी पकडले

कोतवाली पोलिसांनी केली कामगिरी,

अहमदनगर/प्रतिनिधी ः नगर शहरात रात्रीच्या वेळी प्रवाशांना लुटणार्‍या दोघांना अटक करण्यात कोतवाली पोलिसांना यश आले. मोईन बादशहा शेख (वय 22, रा. मुक

काँग्रेस नेते हार्दिक पटेल,मंत्री धनंजय मुंडे यांची कर्जतला जाहीर सभा
धार्मिक स्थळांच्या सुरक्षेची काळजी घ्या : पोलिस निरीक्षक गायकवाड
नितीन गडकरी व शरद पवार येणार एकाच मंचावर.. ४ हजार कोटींच्या कामांचा शुभारंभ

अहमदनगर/प्रतिनिधी ः नगर शहरात रात्रीच्या वेळी प्रवाशांना लुटणार्‍या दोघांना अटक करण्यात कोतवाली पोलिसांना यश आले. मोईन बादशहा शेख (वय 22, रा. मुकुंदनगर) व शाहरूख आलम शेख (वय 27, रा. नागरदेवळे ता. नगर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता दोघांना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शुक्रवारी (दिनांक 10 मार्च) रात्री दहा ते साडे दहा वाजण्याच्या दरम्यान श्रीमंत कोंडीबा पवार (वय 70, रा. एकनाथनगर, केडगाव) हे नेवासकर पेट्रोल पंपासमोरून घराकडे जात असताना एका दुचाकीवरील तिघांनी त्यांना बळजबरीने लुटून खिशातील एक हजार 820 रुपये काढुन घेऊन पळून गेले होते. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शोध पथकाकडून सुरू असताना हा गुन्हा मोईन बादशहा शेख व त्याच्या साथीदारांनी मिळून केला असून गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीसह ते माळीवाडा वेशीजवळ येणार असल्याची माहिती कोतवालीच्या गुन्हे शोध पथकाला मिळाली. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने माळीवाडा वेस येथे सापळा लावल्यावर दुचाकीवरून आलेल्या दोन संशयितांना थांबण्याचा इशारा केला असता ते पळून जाऊ लागल्याने त्यांना पथकाने पकडले. त्यांची नावे मोईन बादशहा शेख व शाहरूख आलम शेख अशी आहेत. त्यांनी श्रीमंत पवार यांना लुटल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून एक हजार 820 रुपये व दुचाकी असा 41 हजार 820 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दरम्यान त्यांनी मागील सहा महिन्यांमध्ये बसस्थानक परिसरात लुटमार केली असून आणखी गुन्हे उघडकीस येत आहेत. याबाबत अधिक तपास पोलिस अंमलदार शरद गायकवाड करीत आहेत. या दोघांना पकडण्याची कारवाई उपनिरीक्षक मनोज कचरे, अंमलदार गायकवाड, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, अब्दुल कादर इनामदार, योगेश खामकर, संदीप थोरात, अमोल गाढे, सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, सागर मिसाळ यांच्या पथकाने केली.

COMMENTS