Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचे

पुणे/प्रतिनिधी ः मार्च महिना असला तरी, गेल्या काही दिवसांपासून पावसाचे वातावरण असून, हवामान विभागाने देखील आजपासून ते 18 मार्चपर्यंत अवकाळी पावसा

फलटण तालुका सहकारी दुध संघाची निवडणूक बिनविरोध
कृष्णा नदीकाठी 8 फूटी मगर विश्रांतीला, प्रशासन सतर्क
म्हसवड शहरात दहा दिवसांतून एकदा पाणी; म्हसवड नगरपरिषदे विरोधात काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

पुणे/प्रतिनिधी ः मार्च महिना असला तरी, गेल्या काही दिवसांपासून पावसाचे वातावरण असून, हवामान विभागाने देखील आजपासून ते 18 मार्चपर्यंत अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातपावसाच्या सरी बरसणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
या महिन्यात आतापर्यंत दुसर्‍यांना शेतकर्‍यांना अवकाळीचा सामना करावा लागत आहे. यामुळे काढणीला आलेल्या पिकांचे तसेच द्राक्ष बागांचे मोठे नुकसान होण्याचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे, की बुधवार 15 मार्च रोजी धुळे, जळगाव, नाशिक, औरंगाबाद आणि जालन्यात काही ठिकाणी गारपिटीची शक्यता असून वादळी पाऊस होणार आहे. गुरुवार 16 मार्च रोजी विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी आयएमडीने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या दिवशी कोकणासह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 17 मार्च रोजी जळगाव, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी, वादळी वार्‍यासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. तर 18 मार्च रोजी अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम आणि यवतमाळमध्ये काही ठिकाणी वादळी वार्‍यासह गारपिटीची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात देखील हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

शेतकर्‍यांनी शेतमालाची काळजी घेण्याचे आवाहन – हवामान विभागाकडून अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला असून, शेतकर्‍यांनी आपल्या शेतमालाची काळजी घेण्याचे आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आले आहे.14 ते 18 मार्च दरम्यान विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत विजांचा कडकडाट, अतिवृष्टीसह वेगाने वारे वाहण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. या कालावधीत जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी आपल्या शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी. शेतमाल सुरक्षीत ठिकाणी साठवावा. बाजार समितीतही विक्रीसाठी आणलेला माल सुरक्षीत ठेवावा. मालाचे नुकसान होणार नाही;याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  

COMMENTS