Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्री हरिहर केशव गोविंद भगवान यात्रोत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन  

श्रीरामपूर/प्रतिनिधी ः श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील श्री हरिहर केशव गोविंद भगवान यांचा यात्रोत्सव गुढी पाडव्याच्या दिवशी सुरु होणार असून

आत्मा मालिक मध्ये साईच्या कुस्ती प्रशिक्षणासाठी खेळाडूंची भरती
संगमनेर शहराला पावसाने झोडपले
दूध भेसळ प्रकरणातील मुख्य आरोपीचा जामीन मंजूर

श्रीरामपूर/प्रतिनिधी ः श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील श्री हरिहर केशव गोविंद भगवान यांचा यात्रोत्सव गुढी पाडव्याच्या दिवशी सुरु होणार असून तीन दिवस चालणार्‍या या यात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात आलेली आहे.
यात्रा कमीटीच्या वतीने प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की बुधवार दिनांक 22 मार्च चैत्र शुद्ध 1 गुढीपाडवा या दिवशी सकाळी पुणतांबा येथुन आणलेल्या पवित्र गंगाजल कावड मिरवणूक त्यानंतर श्री हरिहर केशव गोविंद भगवान यांना उक्कलगाव ग्रामस्थांच्या वतीने गणवेश परिधान केला जाणार आहे 11 वाजता गुढी पहाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी चार वाजता डफ मिरवणूक होईल. सायंकाळी 8 ते 10 या वेळेत सालाबादप्रमाणे महंत उध्दव महाराज मंडलीक यांचे जाहीर हरिकिर्तन होणार आहे. गुरुवार दिनांक 23 मार्च रोजी सकाळी 11 ते 5 या वेळेत भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे सायंकाळी 7 वाजता शोभेच्या दारुची अतिषबाजी करण्यात येणार आहे. रात्री 9 वाजता आँर्केस्ट्रा आयोजित करण्यात आलेला आहे. शुक्रवार दिनांक 24 मार्च रोजी 4 वाजता कुस्त्यांचा जंगी हगामा आयोजीत केला असुन श्री हरिहर केशव गोविंद भगवान हे अतिशय जागृत देवस्थान आहे दर वर्षी गुढी पाडव्याला येथे मोठी यात्रा भरते त्या यात्रेकरीता भाविक दुरदुरवरुन येत असतात तीन दिवस चालणार्‍या या यात्रोत्सवाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन हरिहर केशव गोविंद भगवान यात्रा कमिटीचे अध्यक्ष प्रकाश नानासाहेब थोरात उपाध्यक्ष रविंद्र किशोरनाना थोरात सचिव विकास रामदास पा. थोरात खजिनदार अनिल जनार्धन थोरात यात्रा कमीटी व उक्कलगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS