Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समृद्धीवर लवकरच ट्रॅफिक मॅनजमेंट सिस्टीम

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई/प्रतिनिधी ः समृद्धी महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून अपघाताची मालिका सुरु असून, ही मालिका काही संपण्याची चिन्हे नाही. रविवारी झालेल्या अ

चोरीची मोपेड विकणारा अटकेत  
बाल हत्याकांडातील गावित बहिणींची फाशीची शिक्षा रद्द; मरेपर्यंत जन्मठेप
आई-वडिल अशिक्षित असूनही संघरत्न झाला उपशिक्षणाधिकारी

मुंबई/प्रतिनिधी ः समृद्धी महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून अपघाताची मालिका सुरु असून, ही मालिका काही संपण्याची चिन्हे नाही. रविवारी झालेल्या अपघातात एकाच कुटुबांतील 6 जणांचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे पडसाद सोमवारी विधानसभेत उमटले. आमदार संजय रायमुलकर आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याबाबत प्रश्‍न विचारत अपघातप्रवण स्थळांवर उपायोजना करणार का, असा सवाल केला.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गावर लवकरच ट्रॅफिक मॅनजमेंट सिस्टीम लावणार असल्याची घोषणा केली. तसेच महामार्गावर जिथे एंट्री होते, तिथेच गाडीतल्या प्रवाशांची तपासणी केली जाईल. जास्त प्रवासी असतील, तर अडवले जाणार असल्याचे सांगितले.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, विरोधीपक्षनेत्यांनी मांडलेला मुद्दा गंभीर आहे. या महामार्गावर काही स्पॉट असे तयार झालेत की तिथे अपघात होत आहेत. मुळात समृद्धी महामार्ग सरळ आहे. त्याला वळणे कमी आहेत. काही स्पॉटवर मध्यंतरी माकडांचा वावर होता. अशा स्पॉटची माहिती गोळा केली आहे. सुधारणा सुरू आहे. त्याच्यावर इंटलिजेंट ट्रॅफिक मॅनजमेंट सिस्टीम लावत आहोत. त्यामुळे ओव्हर स्पीड, अपघात घडेल असा स्पॉट तयार झाला असेल, तर त्याची पूर्वसूचना देता येईल. कालच्या घटनेनंतर अशा सूचना दिला आहेत की, गाडीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असले, तर त्यांना एंट्री करतानाच हटकले जाईल. आमदार रायमुलकर म्हणाले की, समृद्धी महामार्गावर जात असताना शिवणी गावानजीक पुलावर मोठे कचके बाजूला पडलेले आहेत. वाहन स्पीडमध्ये असल्यानंतर ते चालकाच्या लक्षात येत नाही. गाडी पुलावर गेली की वाहनचालकाचे नियंत्रण सुटते. त्यामुळे गाडीने चार पलट्या घेतल्या. मी सभागृहाला विनंती करतो की, असे काही अपघातप्रवण स्थळ आहेत. त्यांची चौकशी करून दे दुरुस्त करणार आहात का? या अपघातात जे मृत्युमुखी पडले, त्यांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर करणार का, असा सवाल त्यांनी केला. मंत्री शंभूराज देसाई यांनी यावर निवेदन केले. ते म्हणाले, या अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. अपघात सकाळी आठ वाजून पाच मिनिटांच्या सुमारास झाला. वाहनात जवळपास 13 व्यक्ती प्रवास करत होत्या. वाहनाची क्षमता सात व्यक्तींची होती. ओव्हरस्पीड आणि चालकाचे नियंत्रण सुटणे ही अपघाताची सकृतदर्शनी कारणे दिसत आहेत. तरी सुद्धा मृतांच्या नातेवाईकांना मदत देण्याच्या अनुषंगाने सर्व बाबी तपासून उचित कार्यवाही केली जाईल, असे आश्‍वासन त्यांनी यावेळी दिले.

COMMENTS