सातारा प्रतिनिधी - प्लास्टिकच्या अतिवापरामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आहे. त्यामुळेच येणाऱ्या नव्या पिढीला पर्यावरण वाचवण्याची गोडी ला
सातारा प्रतिनिधी – प्लास्टिकच्या अतिवापरामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आहे. त्यामुळेच येणाऱ्या नव्या पिढीला पर्यावरण वाचवण्याची गोडी लागावी आणि यातून पर्यावरणाचे संतुलन राखता यावे, या उद्देशाने सातारच्या विद्यावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट संचालित छत्रपती शाहू अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना गेली एकवर्ष प्लास्टिक निर्मूलनाचे धडे दिले जात आहेत.
संस्थेच्या अध्यक्षा सौ. वेदांतिकाराजे भोसले यांच्या संकल्पनेतून गेल्या वर्षभरात विद्यार्थ्यांनी शाळेत पाण्याची बॉटल आणि खाऊच्या पुड्यांच्या माध्यमातून येणारे प्लास्टिक संकलित करून आज ते प्लास्टिक पुर्ननिर्मितीसाठी दिले आहे.
या संकल्पनेची सर्व शाळांना माहिती व्हावी व पर्यावरण निर्मूलनाचे काम मोठ्या प्रमाणात व्हावे, या उद्देशाने सातारच्या गांधी मैदानावरून छत्रपती शाहू अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक रॅली काढण्यात आल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा सौ.वेदांतिकाराजे भोसले यांनी दिली आहे.
COMMENTS