Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

घरगुती गॅस, खाद्यतेलाचे भाव, सामान्य नागरिकांना परवडेल असे ठेवावे

महिलांचे राज्य शासनाला साकडे

छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी - राज्य सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात महिलांसाठी भरीव तरतुदी केल्याने ग्रामीण भागातील महिला राज्य सरकारच्या अर्

सचिव भांगेंच्या कृपाशीवार्दा मुळे बार्टीच्या महासंचालकांचा बेभान डान्स
महायुतीचा सुपडा साफ करणार : मनोज जरांगे
औरंगाबादमध्ये शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या

छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी – राज्य सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात महिलांसाठी भरीव तरतुदी केल्याने ग्रामीण भागातील महिला राज्य सरकारच्या अर्थसंकल्पावर समाधान व्यक्त करत आहेत. मात्र घरगुती गॅसच्या व तसेच खाद्यतेलाच्या वाढत्या किमतीमुळे ग्रामीण भागातील गृहिणी नाराजी देखील व्यक्त करत आहेत. घरातील आर्थिक बजेट नेहमी महिलांकडेच असते आणि त्यात घरगुती गॅस तसेच खाद्यतेलांच्या दिवसेंदिवस वाढ होत असलेल्या किमतीमुळे ग्रामीण भागातील महिलांचे अर्थिक बजेट कोलमडत आहे. राज्य सरकारने ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक बजेटचा विचार करून घरगुती गॅस, खाद्यतेल तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी कराव्यात, अशी मागणी ग्रामीण भागातील महिलांकडून केली जात आहे.

COMMENTS