Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वकिलाची बोलती बंद करण्यासाठी चक्क जादूटोणा करण्याचा धक्कादायक प्रकार

धुळे प्रतिनिधी - धुळे न्यायालयात सुरू असलेल्या अंतिम युक्तीवादात विरोधी पक्षकाराच्या वकिलाची बोलती बंद करण्यासाठी चक्क जादूटोणा करण्याचा ध

सीबीएसईच्या 15 फेबु्रवारीपासून दहावी-बारावीच्या परीक्षा
समीर वानखेडेंची मुंबई उच्च न्यायालयात धाव
अवघ्या 11 वर्षीय चिमुकलीवर 9 जणांकडून सामूहिक बलात्कार.

धुळे प्रतिनिधी – धुळे न्यायालयात सुरू असलेल्या अंतिम युक्तीवादात विरोधी पक्षकाराच्या वकिलाची बोलती बंद करण्यासाठी चक्क जादूटोणा करण्याचा धक्कादायक प्रकार धुळ्यात आज रोजी घडला आहे. धुळे जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत तसेच न्यायालयाच्या परिसरामध्ये वकिलाचे फोटो काढून नाशिक येथील मौलाना याला व्हाट्सअप द्वारे पाठवून वकिलांने अंतिम सुनावणीच्या वेळेस आरोपी विरोधात जास्त बोलू नये किंवा त्याची बोलतीबंद व्हावी यासाठी जादूटोणा करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

ॲड. शामकांत रावजी पाटील यांच्या फिर्यादीवरून निसार शेख अमीर खाटीक याच्या विरोधात नरबळी आणि इतर अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार धुळे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निसार शेख अमिर खाटीक विरुद्ध पंढरीनाथ भिला पाटील यांच्या विरोधात दिवाणी दावा क्र. 219 / 2016 प्रमाणे धुळे येथील दिवाणी वरीष्ठ न्यायाधीश यांच्या न्यायालयामध्ये चालु असल्याच्या सदर दाव्याच्या अंतिम युक्तीवादामध्ये पंढरीनाथ भीला पाटील यांचे वकील ॲड. शामकांत पाटील यांनी जास्त बोलु नये किंवा त्यांची बोलती बंद करण्यासाठी न्यायालयाची इमारत व आवारामध्ये विना परवानगी पक्षकार पंढरीनाथ भिला पाटील आणि त्यांचे वकील शामकांत पाटील यांचे फोटो जादुटोणा करण्याच्या उद्देशाने नाशिक येथील एका मौलानाच्या मोबाईल व्हॉट्सअपवर पाठविले. ही बाब ॲड. शामकांत पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधित संशयित आरोपी निसार शेख आमिर खाटीक याची चौकशी करून मोबाईलची तपासणी केल्यानंतर त्याने ही बाब उघडकीस आली.

ॲड शामकांत पाटील यांनी धुळे शहर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल केला असून यातील आरोपी निसार शेख समीर खाटीक राहणार देवपूर याला शहर पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे करीत आहेत.

COMMENTS