Homeताज्या बातम्या

जिल्हा काँग्रेसच्या वतीने मोदी सरकारच्या आणि अडाणी समुहाच्या विरोधात आंदोलन

जालना प्रतिनिधी - जालन्यात आज काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्रातील मोदी सरकारच्या आणि अडाणी समूहाच्या विरुद्ध सार्वजनिक संस्था असलेल्या ए

छत्तीसगडमध्ये दोन चकमकींत 14 नक्षलवादी ठार
कृत्रिम पावसाच्या प्रयत्नात, दुब‌ईत ढगफुटीने महापूर!
मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली

जालना प्रतिनिधी – जालन्यात आज काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्रातील मोदी सरकारच्या आणि अडाणी समूहाच्या विरुद्ध सार्वजनिक संस्था असलेल्या एलआयसी, एसबीआयचा पैशाचा महाघोटाळा केल्याचा आरोप करत आंदोलन करण्यात आलं. या वेळी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्षा सह जिल्ह्यातील पद अधिकाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेऊन जालन्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एसबीआय बँकेच्या समोर जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी प्रतिक्रिया देताना काँग्रेस जिल्हा अध्यक्ष राजेभाऊ देशमुख यांना प्रश्न विचारताना पक्षाला अहवाल द्यायचा म्हणून आंदोलन आहे.?का.? असा प्रश्न उपस्थित केला असता त्यांनी माध्यमांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चक्क पक्षाला अहवाल द्यावाच लागतो. म्हणून हे आंदोलन करावं लागतं, अशी प्रतिक्रिया दिल्याने फक्त अहवालासाठीच आंदोलन का.? असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे. 

COMMENTS